मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी साहित्य व कला सेवा व कामाक्षी क्रिएटिव्ह आयोजित नाट्य लेखन स्पर्धा – २०२६

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “मराठी साहित्य व कला सेवा” आणि “कामाक्षी क्रिएटिव्ह” यांच्या संयुक्त विद्यमाने “नाट्य लेखन स्पर्धा २०२६” आयोजित करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीला समाजमन प्रतिबिंबित करण्याचे माध्यम मानून नवोदित तसेच प्रस्थापित लेखकांना सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशाने ही स्पर्धा आखण्यात आली आहे.

स्पर्धा सर्व वयोगटांतील लेखकांसाठी खुली आहे. दोन अंकी नाटकांच्या स्वरूपात स्वतंत्र किंवा संयुक्त लेखन मान्य आहे. नाटकाचे विषय कोणतेही असू शकतात, मात्र साहित्यचौर्य (Plagiarism) आढळल्यास संहिता रद्द करण्यात येईल. संहितेचे टंकलेखन मराठी भाषेत, संगणकावर करणे अनिवार्य आहे; हस्तलिखित/छायाचित्र स्वरूपातील संहिता स्वीकारली जाणार नाही.

संहिता पाठवण्यासाठी अंतिम तारीख ३० जून २०२६ असून, निकाल २७ जुलै २०२६ रोजी जाहीर केला जाईल. संहितेच्या मुद्रित दोन प्रती आयर्न फिल लाँड्री, रूम नंबर १२१, चाळ क्रमांक ११, म्युनिसिपल लेबर कॅम्प, एमएमजीएस मार्ग, नायगाव, दादर, मुंबई – ४०००१४ या पत्त्यावर टपालाद्वारे तसेच PDF आणि Word स्वरूपात ई-मेल: marathisahityavkalaseva@gmail.com या पत्त्यावर पाठवता येईल.

प्रवेश शुल्क ₹५००/- असून, शुल्क जमा केल्यावर स्क्रीनशॉट व्हॉट्सअ‍ॅपद्वारे गुरुदत्त दिनकर वाकदेकर (मो. ९९८७७४६७७६) यांना पाठवावा. सर्व सहभागी लेखकांना सहभाग प्रमाणपत्र बक्षीस वितरण कार्यक्रमात दिले जाईल. प्रथम पारितोषिक ₹१०,०००/- + सन्मानचिन्ह + सन्मानपत्र, द्वितीय ₹५,०००/- + सन्मानचिन्ह + सन्मानपत्र, तृतीय ₹३,०००/- + सन्मानचिन्ह + सन्मानपत्र, तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके सन्मानचिन्ह व सन्मानपत्र यांच्यासह प्रदान केली जातील.

निवडक नाटकांची अंतिम फेरी व सार्वजनिक सादरीकरण आयोजकांकडून कळवले जाईल. नाटकांचे मूल्यमापन ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यलेखक व साहित्यिक यांचा समावेश असलेल्या परीक्षक मंडळाद्वारे आशय, संवाद, नाट्यमयता, व्यक्तिरेखा आणि सामाजिक संदेश यांच्या निकषांवर केले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : गुरुदत्त दिनकर वाकदेकर – ९९८७७४६७७६, राकेश तळगावकर – ८५९१८२५७७५.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त प्रभाग समिती ‘क’ अंतर्गत आठवडे बाजारही बंद; वाहतुकीस...
Read More
कामोठेत अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेची धडक कारवाई; १८ सिलेंडरसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी महागाईने त्रस्त जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता; डिझेलवरील करकपातीसाठी हालचाली...
Read More
इंधन दरवाढीवर मोठा निर्णय? भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलवरील VAT कमी करण्याची तयारी

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि जि. प.सदस्य विक्रांत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ०६ जून...
Read More
गुहागर विधानसभा क्षेत्रात २५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!

देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश! 🌍 परदेश दौऱ्यावरून परतताच पीएम मोदी ॲक्शन...
Read More
देशात काहीतरी मोठं घडणार? सर्व केंद्रीय मंत्र्यांना दिल्ली न सोडण्याचे पंतप्रधान मोदींचे आदेश!