जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेचा वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण यांच्यावतीने गौरव

देहदान व अवयव दान” या कार्याची घेतली विशेष दखल

आबलोली(संदेश कदम)

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज यांच्या देहदान व अवयव दान कार्याची दखल घेऊन चिपळूण तालुक्यातील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डेरवण या महाविद्यालयाच्या वतीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज या संस्थेला गौरवण्यात आले. हा गौरव जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर यांना वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे नेताजी पाटील यांच्या हस्ते वृक्ष भेट आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नाणीज यांच्या देहदान व अवयव दान या उपक्रमाचा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रमाणावर फायदा झाला आहे तसेच एका व्यक्तीच्या देह दानामुळे व अवयव दानामुळे जवळपास आठ व्यक्तींचे प्राण आपण वाचवू शकतो असे वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक संतोष कुमार भिसे यांनी बोलताना सांगितले.या कार्यक्रमाला संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर, जिल्हा निरीक्षक दीपक तावडे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मोरे, डेरवण वालावलकर महाविद्यालयाचे प्रमुख नेताजी पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें