BLA नियुक्ती साठी 264 विधानसभेकरिता ॲड. संतोष आग्रे यांची निवड
तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)-शिवसेना पक्षाची बांधणी युद्धपातळीवर सुरु असून याचाच एक भाग म्हणून विशेष सखोलपुनरीक्षण २०२६ करिता शिवसेना पक्षाच्या अधिकृत बूथ लेव्हल एजंट (बी एल ए ) नियुक्ती करनेकरिता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्राधिकृत व्यक्ती म्हणून गुहागर तालुका सचिव ॲड. संतोष आग्रे यांची शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या कडून अधिकृत निवड करण्यात आली आहे.
नुकतीच गुहागर येथे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री मा. उदय सामंत यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये ॲड. संतोष आग्रे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमात गुहागर विधानसभा नेते राजेश बेंडल, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर,जिल्हापरिषद पशु सौंवर्धन सभापती महेश नाटेकर, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल,ओबीसी नेते पांडुरंग पाते,संघटक प्रल्हाद विचारे, शहरप्रमुख निलेश मोरे,पंचायत समिती सदस्य संदिप गोरीवले, सुचिता घाणेकर, सारिका दाभोलकर, नगरसेवक अमोल गोयथळे, सुजित साटले, विदिशा दणदणे, स्वरा तेलगडे, स्वीकृत नगरसेवक अमरदीप परचूरे, लीगल सेल तालुका अध्यक्ष ॲड. सुशिल अवरे, जेष्ठ शिवसैनिक आत्माराम मोरे,सरपंच आर्या मोरे,योगिता पालकर, तुकाराम निवाते गुरुजी यांसह सर्व उपतालुकाप्रमुख, विभाप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, पक्षाचे बीएलए, शहर पदाधिकारी, महिला आघाडी,युवासेना पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
















