कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई
अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई
नवीमुंबई (मंगेश जाधव)
कामोठे प्रभाग समिती ‘क मार्फत अनधिकृत अतिक्रमण व फेरीवाले यांच्यावर मंगळवारी आणि बुधवारी व्यापक स्वरूपात धडक कारवाई करण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार करण्यात आलेल्या या कारवाईत विविध ठिकाणांवरील अनधिकृत स्टॉल, नर्सरी, फेरीवाले व हातगाड्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले तसेच काही ठिकाणी झोपड्या हटविण्यात आल्या.
महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिल्या असून त्यानूसार कामोठे सेक्टर १९ मधील मारुती स्वीट व चेतक स्वीट परिसरातील अनधिकृत स्टॉलवर कारवाई करून सिलेंडर, शेगडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सेक्टर ७ येथील एमएनआर स्कूल चौकात अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कामोठे पोलीस स्टेशन समोर फेरीवाल्यांवरही कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.
याचबरोबर सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने व प्रभाग अधीक्षक दशरथ भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सेक्टर १९, २५, अक्षर बिल्डिंग परिसर, खान्देश्वर स्टेशन, सेक्टर २१ व सेक्टर ३४ येथे अनधिकृत व विनापरवाना नर्सरींवर कारवाई करून संबंधित झोपड्या तोडण्यात आल्या.
तसेच खान्देश्वर स्टेशन परिसरात अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.
सेक्टर २१ येथे दोन नर्सरींसह भंगार व सायकल विक्रेत्यांच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. सेक्टर ३४ येथे अनधिकृत हातगाडी हटविण्यात आली. तसेच नीलकंठ स्वीट परिसरात अनधिकृत नारळ विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.
अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरती महापालिकेने तोडक कारवाईचा बडगा उचलला असून यापुढेही अनधिकृत व्यवसायधारकांवर अशाच प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहील, असे महापालिकेतर्फे सूचित करण्यात आले आहे.

प्रभाग समिती ड अंतर्गत नविन पनवेलमध्ये अतिक्रमण कारवाई

प्रभाग समिती ‘ड’ मार्फत दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी नविन पनवेल परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सेक्टर 3 येथील अनधिकृत भाजी व फळ विक्रेत्यांकडून माल जप्त करण्यात आला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाहीजी रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे रत्नागिरी : तालुक्यातील निवेंडी फाट्याजवळ आज (दि....
Read More
बोरीवली–जयगड बसचा निवेंडी फाट्याजवळ अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; 'सावध गाव-सुरक्षित गाव' मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन  राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या आणि अनोळखी व्यक्तींच्या...
Read More
राजापूर तालुक्यात फिरत्या विक्रेत्यांच्या नावाखाली तरुणींची फसवणूक; ‘सावध गाव-सुरक्षित गाव’ मोहिमेअंतर्गत जनजागृतीचे आवाहन

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह पेपरफुटी, शिक्षणातील घोटाळे आणि जबाबदारीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे...
Read More
मीम्स, फलक आणि घोषणांनी दणाणले पुणे; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या पुढाकारातून...
Read More
प्रोजेक्ट उन्नती-२ अंतर्गत माटुंगा येथे ३० तासांचे समुपदेशन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी...
Read More
प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन अनिवार्य; ‘वाहन’...
Read More
गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू पुरुषोत्तमपुरी येथे अतिभारामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज;...
Read More
बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक माहिती न दिल्यास ग्रामपंचायत व पोलीस पाटलांवरही कारवाई; साटवली ग्रामस्थांनी...
Read More
साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

■ स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत ■ *धारतळे कोतापूर फाटा नजीक उत्सव रिसॉर्ट मधील दुर्दैवी घटना*...
Read More
स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न