मराठ्यांचा इतिहास-01

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठ्यांचा इतिहास-01

❝ मुसलमान सत्ताधारी हिंदूंवर सतत अत्याचार करीत होते. त्यात हिंदू समाजाच्या व देशाच्या दीर्घकालीन हानीस कारण झालेला सर्वांत मोठा अत्याचार म्हणजे बळजबरीने अनेक हिंदूंचे केलेले धर्मांतर होय. मुसलमानांनी बाटविलेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्यास हिंदू समाजाचा फार मोठा विरोध होता. समाजाचा हा विरोध मोडून काढणे मोठमोठ्या प्रतिष्ठित व्यक्तींनाही त्याकाळी शक्य नव्हते. उलट, बाटविलेल्यांना स्वधर्मात घेण्याची गोष्ट राहोच; परंतु त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांनाही स्वधर्मात मुकावे लागे.

अशा त्या कठीण काळात, विशेषतः सर्व देशभर मुसलमानी सत्तेचा फार मोठा प्रभाव असताना, शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकर या प्रतिष्ठित व बलाढ्य सरदारास पुन्हा हिंदू धर्मात आणले. बजाजी निंबाळकर हा विजापूर दरबाराच्या बळजबरीमुळे मुसलमान झाला होता. शिवाजी महाराजांनी त्यास शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेतले. अफजलखानाने बळाने बजाजीस बाटविले असल्याने त्याचा काही दोष नसल्याचे शिवाजी महाराज व मातोश्री जिजाबाई यांनी समाजास पटवून दिले. त्यामुळे त्याच्या शुद्धीकरणास मान्यता मिळाली. शिखर शिंगणापूरच्या उपाध्यांकडून हे शुद्धीकरण विधीपूर्वक करून घेण्यात आले.

तसेच, शुद्धीकरणानंतर ती व्यक्ती पुन्हा हिंदू समाजात पूर्णपणे एकरूप होण्यासाठी तिला समाजात मानाने स्थान मिळणे आवश्यक आहे, ही महत्त्वाची बाब शिवाजी महाराजांनी लक्षात घेतली. म्हणूनच त्यांनी आपली मुलगी सखुबाई हिचा विवाह बजाजी निंबाळकरांचा मुलगा महादजी याच्याशी लावून दिला. तसेच त्याला पुणे परगण्यातील वाळे येथील पाटीलकीही दिली. अशा प्रकारे महाराजांनी केवळ शुद्धीकरणच केले नाही, तर त्या शुद्धीकरणास समाजात प्रतिष्ठाही मिळवून दिली.

दुसरे महत्त्वाचे शुद्धीकरण म्हणजे प्रसिद्ध योद्धा नेताजी पालकर यांचे. नेताजी पालकर मुसलमान बनल्यानंतर जवळजवळ दहा वर्षे औरंगजेबाच्या चाकरीत राहिला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजी महाराजांवर औरंगजेबाने काढलेल्या मोहिमेत तो दिलेरखानाबरोबर महाराष्ट्रात आला. त्यानंतर तो सरळ रायगडावर जाऊन महाराजांच्या पाया पडला.

शिवाजी महाराजांचे मोठेपण असे की, जवळजवळ आठ-दहा वर्षे इस्लाम धर्मात राहिलेल्या नेताजी पालकरांना त्यांनी शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. त्यांच्या बायका-मुलांनाही शुद्ध करून घेतले. यानंतर जबरदस्तीने ख्रिस्ती वा मुसलमान झालेल्या अनेक लोकांनी आपल्यालाही शुद्ध करून घ्यावे, अशी मागणी केली.

या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शिवाजी महाराजांनी शुद्धीकरण खाते सुरू केले.

@Facebook viral 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी...
Read More
प्राचार्य प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार प्रदान

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात सार्वजनिक वाहतूक वाहनांसाठी व्हीएलटीडी आणि पॅनिक बटन अनिवार्य; ‘वाहन’...
Read More
गाडीत पॅनिक बटन सक्तीचे; नियम न पाळल्यास फिटनेस व परवाना धोक्यात

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू पुरुषोत्तमपुरी येथे अतिभारामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज;...
Read More
बीडमध्ये अधिकमास यात्रेत भीषण दुर्घटना; 50 भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरीत उलटली, महिलेचा मृत्यू

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक माहिती न दिल्यास ग्रामपंचायत व पोलीस पाटलांवरही कारवाई; साटवली ग्रामस्थांनी...
Read More
साटवलीत अवैध हातभट्टी दारू धंद्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक

स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

■ स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत ■ *धारतळे कोतापूर फाटा नजीक उत्सव रिसॉर्ट मधील दुर्दैवी घटना*...
Read More
स्विमिंग पूल मध्ये बुडून सहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी द्वारे दि. ८ जून २०२६ रोजी ‘जागतिक महासागर दिन’ निमित्त पांढरा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता आणि जनजागृती मोहीम संपन्न

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध   विरार - संदीप शेमणकर केंद्र...
Read More
महागाई विरोधात शिवसेनेचे विरारमध्ये तीव्र आंदोलन; चूल मांडून आणि चाबकाचे आसूड ओढत सरकारचा निषेध

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा

महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा राजापूर- संदीप शेमणकर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला...
Read More
महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत ‘जैतापूरचा राजा’ मंडळाला बक्षीस रक्कम जमा

इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार

इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार बारामतीत पत्रकार परिषदेत सल्ला; कर्जमाफीच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचीही...
Read More
इंडिया आघाडीत मतभेदांवर तोडगा निघेल; पक्षांनी टोकाची भूमिका टाळावी : शरद पवार

मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील

मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन कामाचा महापौरांनी घेतला आढावा  सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक : महापौर नितीन पाटील