डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.

crim

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात वृद्धाची हत्या….दहा ते पंधरा जणांचा टोळक्याकडून हल्ला……..तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात.….”

नवीमुंबई (मंगेश जाधव) – डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात झालेल्या निर्घृण हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहुल जाधव यांच्या वडिलांची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या डोंबिवलीजवळील घारीवली परिसरात मंगळवार २८ तारखेला रात्रीच्या सुमारास घडली.

या हत्येप्रकरणी तीन महिलांसह एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींच्या पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घारवली येथील जाधववाडी परिसरात मंगळवारी रात्री राहुल जाधव यांचे भाऊ दिनेश यांना काही तरुणांनी फोन करून बोलावून घेतले.दिनेश येताच १० ते १५ जणांच्या गटाने त्यांच्यावर टोळक्याने जोरदार हल्ला चढविला.

हा वाद सोडवण्यासाठी गेलेले त्यांचे वडील बामा जाधव यांच्यावरही लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी काही मारेकऱ्यांची ओळख पटवली असून तीन महिला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपींमध्ये मयूर पाटील आणि विनोद नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे.या दोघांसह इतर आरोपींचा शोध सुरू आहे.हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली,वादाची पार्श्वभूमी काय होती, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
[30/04, 8:46 pm] Mangesh Jadhav: पनवेल प्रभागात अतिक्रमणा विरोधात महापालिकेची धडक कारवाई
अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत चिकन ,मटण दुकानांवर तोडक कारवाई
नवीमुंबई (मंगेश जाधव)
पनवेल प्रभाग समिती ‘ड मार्फत मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. मंगळवारी झालेल्या या कारवाईत नवीन पनवेल मधील गणेश मार्केटच्या बाजुची चिकनची दुकाने, सेक्टर ३ मनसे रोड येथील चिकन दुकाने , सेक्टर १३ अंबराई गार्डन बाजुला चिकन मटनच्या दुकानांवर तोड़क कारवाई करण्यात आली.

आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार करण्यात आलेल्या या कारवाईत विविध ठिकाणांवरील अनधिकृत चिकन व मटन स्टॉलवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात आले.

महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिल्या आहेत.त्यानूसार चारही प्रभागात अतिक्रमण विरोधी मोठ्या कारवाया सुरू आहेत. या अतंर्गत नवीन पनवेल मधील अनधिकृत चिकन व मटण दुकानांवर कारवाई करण्यात आली.

चिकन व मटण दुकानांच्या वाढलेल्या संख्येमुळे उडणाऱ्या पक्षांची संख्या वाढत आहे व त्याचा परिणाम नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या विमानांना होत असल्यामुळे सदरच्या दुकानंवर कारवाई करण्यात आली .ही कारवाई सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी रूपाली माने व प्रभारी प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे तसेच अतिक्रमण कर्मचारी व रायगड सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत करण्यात आली.

अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरती महापालिकेने तोडक कारवाईचा बडगा उचलला असून यापुढेही अनधिकृत व्यवसायधारकांवर अशाच प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहील, असे महापालिकेतर्फे सूचित करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]