डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

 

पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ संत साहित्य अभ्यासक डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा भावार्थ सेवा अंतर्गत तितिक्षा मासिक कला काव्य संध्येत ‘तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे संस्थापक आणि अध्यक्ष वि. ग. सातपुते यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले, ज्येष्ठ साहित्यिक मंदाताई नाईक, अंजली पटवर्धन, राजश्री आठवले, पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. मधुसूदन घाणेकर, संस्थेच्या बालसचिव एम. अजया आणि निमंत्रक अजिता मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते. कविराज विजय सातपुते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून डाॅ. मधुसूदन घाणेकर संपादित ‘विश्वविक्रमी डहाळी’ या अनियतकालिकाचा १११० वा विशेषांक डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. प्रारंभी शलाका गाडगीळ यांनी ईशस्तवन सादर केले.

डाॅ. मधुसूदन घाणेकर यांनी शीळवादनातून स्वर्गीय आशा भोसले यांच्या गीतांना भावपूर्ण अभिवादन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, अभिनेते निलेश दातार, श्याम भुरके, सुजीत कदम, बंडा जोशी आणि प्रा. शरदचंद्र काकडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाची सांगता निलेश दातार यांनी केली. तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने आयोजित हा सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें