१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव

१७० पेक्षा अधिक महिला व बालकांनी घेतला ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा प्रेरणादायी अनुभव

नवीमुंबई (मंगेश जाधव)

गोरेगाव येथे एक विशेष सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम उत्साहात पार पडला. टार्गेट पब्लिकेशनचे संचालक, अगस्ती लवांडे आणि सामाजिक कार्यकर्ता सचिन बनसोडे यांच्या पुढाकारातून भाकर फाउंडेशनमधील १७० पेक्षा अधिक महिला आणि बालकांसाठी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध धर्म, जाती आणि भाषिक पार्श्वभूमीतील महिला आणि बालक एकत्र येऊन चित्रपटाचा आनंद घेत होते. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन समाजातील महिला आणि मुलं एकाच थिएटरमध्ये बसून शिवरायांचा इतिहास अनुभवत होती. चित्रपटादरम्यान थिएटरमध्ये उमटणाऱ्या टाळ्या, मुलांचा उत्साह आणि महिलांच्या चेहऱ्यांवरील आनंद हे दृश्य स्वतःमध्ये एक वेगळा सामाजिक संदेश देणारं होतं.

अनेक महिला आणि बालकांसाठी हा पहिलाच चित्रपटगृहातील अनुभव होता. काही मुलं मोठ्या पडद्याकडे आश्चर्याने पाहत होती, तर अनेक महिला चित्रपटातील प्रसंगांमध्ये भावूक होताना दिसत होत्या. हा अनुभव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नव्हता, तर एकत्र येण्याचा, सामूहिक आनंद अनुभवण्याचा आणि माणसांमधील आपलेपणा अधिक दृढ करण्याचा होता.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पराक्रमाचा इतिहास नाही, तर सर्वसामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा विश्वास देणारा इतिहास आहे. आज थिएटरमध्ये विविध समाजघटकांतील महिला आणि बालक एकत्र बसून चित्रपट पाहत होते, तेव्हा नकळत त्या विचारांचीच अनुभूती होत होती. जिथे माणूस हा धर्म, जात किंवा भाषेपेक्षा मोठा मानला जातो, जिथे सर्वांना समान आनंद घेण्याची संधी मिळते आणि जिथे एकत्र येण्यातच शक्ती दिसते तिथे समाज अधिक सुंदर बनत जातो. या उपक्रमामुळे महिला आणि बालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या वेळी भाकर फाऊंडेशन अध्यक्ष ॲड दिपक सोनावणे, आणि मंगला कुमठे, जाहिदा शेख, अजय भालेराव, आकाश शिरसागर, मयुर जाधव, प्रशांत चव्हाण, मानसी आचरेकर, उपस्थित होते

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें