खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर… संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर…

संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण
नवीमुंबई (मंगेश जाधव)
चिपळूण तालुक्यातील खेरशेत गाव पुन्हा एकदा सामाजिक जागृती, धम्म विचार आणि परिवर्तनवादी चळवळीच्या उत्साहाने दुमदुमले. चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती गाव शाखा खेरशेत, धम्म भूषण विकास संघ खेरशेत-मुंबई, यशोधरा महिला मंडळ आणि सम्यक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला बुध्द विहारात दि.१३,१४,१५ मे रोजी आयोजित भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वभूषण राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव व तक्षशिला बुद्ध विहाराच्या वर्धापन दिन सोहळ्यास अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. यावेळी प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळ्यामुळे बुद्ध विहार परिसर तीन दिवस विचार, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीच्या तेजाने उजळून निघाला. खेरशेतमध्ये भरलेला हा संयुक्त जयंती महोत्सव केवळ उत्सव न ठरता सामाजिक परिवर्तन, बंधुभाव आणि विचारजागृतीचा प्रेरणादायी सोहळा ठरला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. साक्षी मोहिते यांनी बौद्ध संस्कार विधी पार पाडला. पहिल्या दिवशी अ‍ॅड. विभावरी रजपूत यांनी “भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांसाठी योगदान” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत महिलांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षाचा वेध घेतला. तर बौद्ध उपासिका क्रांतीताई कदम यांनी राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती रमाई यांच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी इतिहास उलगडून सांगितला.
यावेळी यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा शैला कदम यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सूत्रसंचालन साक्षी कदम, प्रबोधिनी कदम आणि संघरक्षिता कदम यांनी प्रभावीपणे केले. स्थानिक महिलांच्या पुढाकारातून सादर करण्यात आलेल्या “स्त्रीभ्रूणहत्या” या सामाजिक आशयघन नाटिकेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
दुसऱ्या दिवशी बालव्याख्याते असित सुर्वे यांनी “विश्वाला युद्ध हवे की बुद्ध?” या विषयावर अत्यंत प्रभावी विचार मांडत शांतता आणि मानवतेचा संदेश दिला. व्याख्याते शिवश्री प्रदीप कांबळे यांनी भगवान बुद्धांचा धम्म, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान यामधील वैचारिक नाते विशद केले. तर शिवश्री महेंद्रसिंग जालगावकर यांनी “फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीची नांदी” या विषयावर विचारमंथन घडवून आणले.
दुसऱ्या सत्रात पूज्य भंतेजी डॉ. ए. सुमेध बोधीजी, राष्ट्रीय महासचिव भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत धम्मदेसना पार पडली. त्यांच्या शांत, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवचनाने उपस्थित धम्मबंधू अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
समारोप प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच बुद्धविहार उभारणीसाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर सभेत गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी खेरशेत संघटनेच्या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक करत काही मान्यवरांचा सत्कार केला. हा भव्य महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुंबई संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, स्थानिक अध्यक्ष सुनील कदम, सम्यक युवा मंच अध्यक्ष आकाश कदम, सामाजिक कार्यकर्ते काशीराम कदम गुरुजी यांच्यासह शरद कदम, संजय कदम, अनंत कदम, प्रदीप कदम, सुधाकर कदम, अ‍ॅड. प्रशितोष कदम, राजेंद्र कदम, मिहीर कदम, विजय कदम, दयानंद कदम, संजोत कदम, मिलिंद कदम, लक्ष्मण कदम, राहुल कदम, प्रतीक मोहिते आदींनी अथक परिश्रम घेतले.
आमदार शेखर निकम यांनीही कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. ते म्हणाले, आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. डॉ.आंबेडकरांच्या आदर्श विचारांची जपणूक करणे नागरिकाचे कर्तव्य आहे. आमदार निधीतून तक्षशिला बुद्ध विहाराच्या सुशोभिकरणासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणाही आ. निकम यांनी यावेळी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
या कार्यक्रमास बहुजन विकास आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश भायजे, पंचायत समिती सदस्य सुभाष जाधव, महेश सावंत, विनोद कदम, संदीप गमरे, खेरशेत येथील पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत जाधव, वसंत जाधव, खेरशेत माजी सरपंच रवी मते, पोलीस पाटील अमर जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, मुंबई संघटनेचे मंगेश जाधव, खेरशेत येथील प्रसिद्ध उद्योजक सोमा बेंडल, महेंद्र कदम, स्वप्निल कदम, अक्षय कदम, सुशांत कदम, नवनीत कदम, नितीन कदम, सुभाष कदम, राजू कासारे, रमेश कदम, ऋषिकेश कदम, रोहन कदम, निखिल कदम, धर्मदास कदम। भिमदास कदम, धर्मवर्धन कदम, ज्येष्ठ सल्लागार चंद्रमणी कदम, राजाराम कासारे, जि.प सदस्य संजय कदम, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते, विलास मोहिते, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): यशवंतराव चव्हाण सेंटर व पार्किन्सन’स डिसीज अँड मूव्हमेंट...
Read More
पार्किन्सनवर बोलू काही’ चर्चासत्राला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी परदेशात जाणाऱ्या सीफेरर्स, विद्यार्थी व कामगारांना होणार मोठा दिलासा पनवेल...
Read More
नवी मुंबई विमानतळावर यलो फीव्हर लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                   दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                           ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे                                                                    दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार 

आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेच्या उपक्रमांना दिली नवी...
Read More
आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी ने शिक्षण प्रेणी Dj श्री सचिन कुळये यांचा सत्कार 

खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर… संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण

खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर… संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण नवीमुंबई (मंगेश जाधव)...
Read More
खेरशेतमध्ये संविधान विचारांचा जागर…  संयुक्त जयंती महोत्सवात प्रबोधनपर व्याख्याने, धम्मदेसना, नाटिका आणि गुणवंतांचा गौरव सोहळा ठरला आकर्षण

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न...उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप...हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली... कारवाई तात्पुरती स्थगित... लवकरच निर्णायक...
Read More
म्हाडाकडून जबरदस्ती मोजणीचा प्रयत्न…उत्तर शिव येथे म्हाडाच्या कारवाईविरोधात 14 गावांचा संताप…हस्तक्षेपामुळे मोठी कारवाई तात्काळ थांबली… कारवाई तात्पुरती स्थगित… लवकरच निर्णायक बैठक

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार   ऐतिहासिक युद्धनौकेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना; स्कुबा डायव्हिंगसह सागरी...
Read More
सिंधुदुर्गात देशातील पहिले ‘अंडरवॉटर टुरिझम’ केंद्र; आयएनएस गुलदार वेंगुर्ले समुद्रात बुडवणार

फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

  फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे 21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर  ...
Read More
फडणवीसांचा FDA मधील भ्रष्टाचारावर दणका; तुकाराम मुंडेंकडे आयुक्तपदाची सूत्रे  21 वर्षांत 25 वी बदली; श्रीधर डुबे SRA वर

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध पर्यावरण आणि जनजीवन धोक्यात आणणारे प्रकल्प सहन करणार नाही; अमोल बोळे...
Read More
बारसूतील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरून वातावरण तापले; स्थानिकांचा तीव्र विरोध

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती

योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती* कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती रत्नागिरी -(वार्ताहर)...
Read More
योगेश पेढांबकर यांची अँटी करप्शन बोर्ड,दिल्लीमार्फत महाराष्ट्र राज्य सचिवपदी नियुक्ती*  कायदेविषयक प्रगल्भता पाहूनच महाराष्ट्र राज्यावर सचिव पदी नियुक्ती
shivam