जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

highlits

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

राजापूर -संदीप शेमणकर

राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची कन्या कु. सोनल सहदेव आरेकर हिची मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशामुळे आरेकरवाडीसह संपूर्ण हातिवले गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कु. सोनल हिने आपले प्राथमिक शिक्षण हातिवले येथील आरेकरवाडी शाळेत पूर्ण केले. त्यानंतर तिने माध्यमिक शिक्षण कोंडे येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण नवजीवन हायस्कूलमध्ये घेतले. शिक्षणाबरोबरच पोलीस भरतीचे ध्येय समोर ठेवून तिने सातत्याने कठोर परिश्रम घेतले आणि अखेर मुंबई पोलीस दलात निवड होण्याचे स्वप्न साकार केले.

सोनलचे वडील सहदेव खेमाजी आरेकर हे शेतकरी असून शेतीसोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आईदेखील शेतीकामात मोलाचा हातभार लावतात. अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबातून आलेल्या सोनलने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.

तिच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी सोनलचे यश प्रेरणादायी ठरत असून, तिच्या या यशामुळे हातिवले गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

“कष्ट, जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे कु. सोनल सहदेव आरेकर होय, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें