चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव
आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम
राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची सार्वजनिक शेती करण्याची परंपरा कायम जपली आहे गेली अनेक वर्षे चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थ एक दिलाने एकत्र येऊन ही सार्वजनिक शेती करत आहेत आज सर्वत्र भात शेती करणे सर्वांनी बंद केले आहे मात्र चव्हाणवाडी गाव याला अपवाद आहे आज गावात सार्वजनिक शेती सोबत वैयक्तिक शेती ही केली जात आहे आज चव्हाणवाडी गाव रूढी परंपरा चाली रीती जपणारा गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे कोणताही सार्वजनिक उत्सव गावात पारंपरिक पद्धतीने साजरा सर्वजण एकत्र येऊन केला जातो गावातील ग्रामस्थांचा शेती करणे हा आवडीचा विषय आहे आज गावातील 103 कुटुंबापैकी सुमारे 90 टक्के कुटुंब आपली वैयक्तिक भात शेती नाचणी करत आहेत आज शेती करणे याबाबत चव्हाणवाडी गावाने परिसरात एक आपली ओळख निर्माण केली असून आपला ठसा उमटवला आहे विशेष म्हणजे या सार्वजनिक शेतीतून पिकवला जाणारा तांदूळ हा शिमगा उत्सवाच्या सार्वजनिक निवेद म्हणजे पोस्थ ला वापरला जातो यामुळे या भाताला एक वेगळी चव लागते आणि ग्रामस्थाना समाधान मिळते आज चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा चालीरीती चे एक माहेरघरच आहे
बातमीदार – मनोहर धुरी सर.














