न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान; इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप

गुहागर (प्रतिनिधी मंगेश जाधव) :

गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तळवली येथे नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आला. इयत्ता ५ वी, ८ वी तसेच इतर वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवानिमित्त उत्साहात स्वागत सोहळा पार पडला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. प्रदीप चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर, शिक्षक वृंद व पालक यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा आणि टाळांच्या गजरात विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता.

नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता. हास्य, टाळ्यांचा कडकडाट आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शाळेच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र शासनामार्फत वितरित करण्यात आलेल्या इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. कुळे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. देवरुखकर सर, श्री. बागल सर व इतर शिक्षक वृंद यांनी केले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. प्रदीप चव्हाण सर, पालक वर्ग तसेच प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. साळुंके सर, सौ. नाईक मॅडम, श्री. गुरसळे सर, श्री. गवळी सर, श्री. देवरुखकर सर, श्री. बागल सर, श्री. केळस्कर सर, श्री. कुळे सर, श्री. पुनस्कर सर, सौ. कांबळे मॅडम, लिपिक श्री. कदम सर, प्रा. जड्याळ सर, प्रा. सावंत मॅडम, श्री. अक्षय चव्हाण यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या उत्साह, आनंद आणि सकारात्मक वातावरणात झाल्याने प्रशालेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ! आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण

राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ! आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण   राजापूर -  राजापूर तालुक्यातील...
Read More
राजापूरच्या वाहतूक सेवेला नवे बळ!     आमदार किरण सामंत यांच्या हस्ते दोन नवीन एसटी बसांचे लोकार्पण

न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

  न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान; इयत्ता ५...
Read More
न्यू इंग्लिश स्कूल तळवलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा गुहागर विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी, बँड पथकाच्या तालावर स्वागत; मान्यवरांच्या...
Read More
श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम राजापूर-राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी गावातील ग्रामस्थांची...
Read More
चव्हाणवाडी गाव म्हणजे रूढी परंपरा गाव  आजही सामूहिक शेती करण्याची पद्धत कायम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम राजापूर/पन्हळे :- शाळेच्या पहिल्याच दिवशी, दि....
Read More
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप : आदर्श सेवा मंडळ पन्हळेचा स्तुत्य उपक्रम

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi

Pinco Online Kazino (Пинко) 2026 – Təhlükəsizlik və Məlumatların Mühafizəsi ▶️ OYNA Содержимое Təhlükəsiz Oyun Ola Bilərsiniz: Pinco Online Kazino...
Read More

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल - आम. शेखर निकम यांचा विश्वास आबलोली (संदेश कदम) कोकण हा पहाडांचा प्रदेश...
Read More
सह्याद्री माती परीक्षण प्रयोगशाळा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – आम. शेखर निकम यांचा विश्वास

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत जून अर्ध्यावर तरी पावसाची प्रतीक्षा कायम; दुबार पेरणीचे संकट आणि पाणीटंचाईची...
Read More
संगमेश्वरात पेरणी झाली, भाताचे कोंब फुटले; पावसाअभावी बळीराजा चिंतेत

ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

⚠️ ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली रिओ डी जानेरोतील Recreio dos Bandeirantes परिसरात...
Read More
ब्राझीलमध्ये हवेत दोन हेलिकॉप्टरची भीषण टक्कर; सहा जणांचा मृत्यू, २० वाहने जळाली

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी

कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी “एक बाठ, एक आशा” संकल्पनेतून...
Read More
कोकणातील रायवळ आंबा संवर्धनासाठी मोठी मोहीम; प्रत्येक जिल्हा परिषद गटात ५ हजार झाडे लावण्याची मागणी