पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
पनवेल महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा दिनांक 22 जून रोजी महापालिका मुख्यालयात स्थायी समिती सभापती बबन मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली.
यावेळी स्थायी समितीचे सर्व सदस्य, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरीक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, सचिव नानासाहेब कामठे, उपसचिव अक्षय कदम, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेकरीता २० नग फिरते स्वच्छतागृह/मोबाईल टॉयलेट ३ वर्षाच्या वॉरंटी सह खरेदी करणे या कामाच्या न्यूनतम दराची निविदा मंजूर करणे या विषयास मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका मालकीच्या प्रभाग समिती क मधील सर्व सार्वजनिक व कार्यालयांमधील शौचालयांचे सुशोभीकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे या कामी न्यूनतम दराची निविदा मंजूरीस स्थायी समितीने मंजूरी दिली. पनवेल महानगरपालिका हद्दीत उद्यानांमध्ये विविध ठिकाणी आवश्यक असणाऱ्या खेळण्यासाठी रबर फ्लोरींग बसविणे याविषयाची माहिती घेऊन विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील तक्का येथील अं.मु.क्र. ४५६ ते १९०/२ अ (मोराज सोसायटी रस्ता) येथील रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती – क, प्रभाग क्र.१३ मधील प्लॉट क्र. ०८, सेक्टर – ३२ कामोठे ख्रिश्चन समाजाकरीता दफनभूमी विकसित करणे या विषयाची सविस्तर माहिती देण्यात आली व विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती – अ,ब व ड इतर मध्ये रस्त्यालगत असणाऱ्या गटर, पादचारी मार्गामधील इन्स्पेक्शन चेंबर्सवर वेळोवेळी आवश्यकतेनुसार सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या दोन वर्षाकरीता झाकणे व किरकोळ दुरुस्ती करणे. या कामासाठी सुधारित वाढीव अंदाजपत्रकास प्रशासकीय व आर्थिक मान्यता मिळण्याबाबतच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब, क, ड व इतर मध्ये समाविष्ट होणाऱ्या गटरांची सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या दोन वर्षाकरीता रस्त्यालगत असणाऱ्या गटर, पादचारी मार्गामधील इन्स्पेक्शन चेंबर्सवर वेळोवेळी आवश्यकतेनुसार FRP ची झाकणे लावणे व किरकोळ दुरुस्ती करण्याच्या विषयाची माहिती देऊन मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ व ब प्रभाग कार्यालय (वॉर्ड ऑफिस) येथे फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामात अडथळा निर्माण करणारे महावितरण कंपनीचे विद्युत खांब, विद्युत वाहिन्या स्थलांतरित करणे व नवीन वीजपुरवठा घेणे कामी विद्युत व्यवस्थेची अनुषंगिक कामे दोन वर्षाकरीता करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती क व ड क्षेत्रामधील रस्त्यावरील पथदिवे (सिडको हस्तांतरीत पथदिवे वगळून) व प्रशासकीय कार्यालये, शाळा, फिश मार्केट, स्मशानभूमी, पाण्याची टाकी, भाजी मार्केट, आंबेडकर भवन, आरोग्य केंद्रे, रुग्णालये, पादचारी उन्नत मार्ग (FOB) व इतर इमारती इत्यादी ठिकाणांच्या विद्युत व्यवस्थेची दोन वर्षाकरीता निगा, देखभाल, दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका मालकीच्या इमारतीमधील विविध प्रकारच्या (स्प्लिट / विंडो / कॅसेट) व विविध क्षमतेच्या (१, १.५, २ TR) वातानुकूलित यंत्रणांची तीन वर्षाकरीता निगा, देखभाल व दुरुस्ती करणे, या कामाची न्यूनतम निविदा मंजूर करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या उद्यानामध्ये डेकोरेटिव्ह पथदिवे खांब उभारून कार्यान्वित करणे विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती अ व ब क्षेत्रामधील रस्त्यावरील पथदिवे (सिडको हस्तांतरीत पथदिवे वगळून) व प्रशासकीय कार्यालये, शाळा, फिश मार्केट, स्मशानभूमी, पाण्याची टाकी, भाजी मार्केट, आंबेडकर भवन, आरोग्य केंद्रे, रुग्णालये, पादचारी उन्नत मार्ग (FOB) व इतर इमारती इत्यादी ठिकाणांच्या विद्युत व्यवस्थेची दोन वर्षाकरीता निगा, देखभाल, दुरुस्ती, सुधारणा व नुतनीकरण करणे कामी वाढीव रक्कमेस (Excess/Saving) मान्यता मिळण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अ व ब क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी दोन वर्षाकरीता विद्युत उपकरणे व विद्युत व्यवस्था भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या विषयास समितीने मंजूरी दिली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे, कळंबोली व खारघर येथील विविध रस्ते दुभाजकांचे सुशोभीकरण करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यांत्रिकी पद्धतीने धुरीकरण व फवारणी सेवा पुरविणेबाबतच्या विषयास मंजूरी देण्यात आली.















