रत्नागिरी एमआयडीसीत भाजप-शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा; ६७ जणांवर गुन्हा, सात जण अटकेत

rv ad

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी एमआयडीसीत भाजप-शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा; ६७ जणांवर गुन्हा, सात जण अटकेत

 

जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील अनेक जखमी; पोलिसांचा तपास सुरू

 

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एमआयडीसी परिसरात रविवारी मध्यरात्री भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून हा संघर्ष झाल्याचे सांगण्यात येत असून, या हाणामारीत दोन्ही गटातील काही व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

 

या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील तब्बल ६७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात जणांना अटक करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे येथील एक युवक वेल्डिंगचे काम करतो. पैशांच्या वादातून हा युवक भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी गेला होता. तेथे झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर युवकाने गावात जाऊन घडलेली माहिती दिली.

 

घटनेची माहिती मिळताच मिरजोळे येथील संतप्त तरुणांनी संबंधित पदाधिकाऱ्याच्या घराकडे धाव घेतली. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आल्याने जोरदार हाणामारी झाली.

 

या घटनेत मिरजोळे येथील एका युवकाचा पाय मोडल्याची माहिती असून, भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्याच्या भावालाही गंभीर मारहाण झाल्याचे सांगितले जात आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची चर्चा आहे.

 

दरम्यान, हा संघर्ष केवळ आर्थिक वादातून झाला नसून, गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांची ही परिणती असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

घटनेनंतर एमआयडीसी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, अधिक तपास सुरू आहे.


#रत्नागिरी #MIDC #रत्नागिरीबातम्या #भाजप #शिंदेसेना #पोलीसतपास #महाराष्ट्रन्यूज #कोकणबातम्या #RatnagiriNews #KonkanNew

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]