आपला राष्ट्रध्वज’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

*‘आपला राष्ट्रध्वज’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

डोंबिवली (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय ध्वज स्वीकार दिनानिमित्त २२ जुलै रोजी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व आणि अक्षरमंच प्रकाशन यांच्या सहकार्याने ‘आपला राष्ट्रध्वज’ या पुस्तकाचे प्रकाशन डोंबिवली येथील संकल्प तीर्थ १५० फूट राष्ट्रध्वजाच्या प्रांगणात संपन्न झाले. कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

अध्यक्षीय भाषणात आमदार राजेश मोरे यांनी ‘आपला राष्ट्रध्वज’ हे पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या पुस्तकाच्या माध्यमातून मुलांना राष्ट्रध्वजाविषयी योग्य माहिती मिळेल आणि सजग, आदर्श नागरिक घडण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्वच्या सर्व महिला सदस्या हिरीरीने समाजोपयोगी आणि लोकहिताची कार्ये करत असून त्यांचे कार्य केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर अनुकरणीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

यावेळी आमदार राजेश मोरे यांनी ‘आपला राष्ट्रध्वज’ हा उपक्रम आगळावेगळा असल्याचे सांगितले. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा जयश्री पंडीत, सचिव लीना चौधरी, प्रकल्प प्रमुख संगीता खर्डीकर, प्रकल्प समन्वयक रोहिणी लोकरे तसेच या उपक्रमाचे संकल्पनाकार डॉ. योगेश जोशी यांनी घेतलेली मेहनत निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा जयश्री पंडीत यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर अक्षरमंच प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांनी ‘आपला राष्ट्रध्वज’ या पुस्तकामागील संकल्पना आणि उपक्रमाची भूमिका उपस्थितांसमोर स्पष्ट केली. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक रोहिणी लोकरे आणि भक्ती भंडारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन भक्ती भंडारी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

माहिती अधिकार दिनानिमित्त लांजा तालुक्यात जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे प्रशासनाला निवेदन; शाळा-महाविद्यालयांत प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, निबंध स्पर्धांसह विविध उपक्रम घेण्याची मागणी

राज्य

शहर चुनें