योगेश तानू पेढांबकर यांचा संघर्ष, जिद्द आणि समाजसेवेचा गौरव

SHARE:

*योगेश तानू पेढांबकर यांचा संघर्ष, जिद्द आणि समाजसेवेचा गौरव;*

 

   🔹दृष्टी ग्रुपकडून अध्यक्ष *ॲड.श्री.जीवन रेळेकर* यांच्याकडून यथोचित सत्कार

 

चिपळूण, प्रतिनिधी : 

चिपळूण तालुक्यातील दृष्टी ग्रुप यांच्या वतीने सामाजिक, कायदेविषयक व जनजागृतीच्या क्षेत्रात महाराष्ट्रभर उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच माहिती अधिकार महाराष्ट्र राज्य प्रमुख मार्गदर्शक तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष-श्री.योगेश तानू पेढांबकर यांचा विशेष सत्कार दृष्टी ग्रुप एकनाथ चिपळूण मार्फत आयोजित करण्यात आला होता.

शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर वकिली क्षेत्रात प्रवेश करत श्री.योगेश तानू पेढांबकर यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे, माहितीचा अधिकार प्रभावीपणे वापरण्यास मार्गदर्शन करणे, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि गरजू नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी नि:स्वार्थपणे पाठपुरावा करणे, तसेच कायद्याविषयी जनजागृती करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. आजपर्यंत अनेक प्रश्न मार्गी अनेकाची कुटुंब बसवण्यात मोलाचा वाटा स्वीकारलेला आहे.

त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची, समाजहितासाठीच्या धडाडीच्या कार्याची आणि नि:स्वार्थ सेवाभावाची दखल घेत दृष्टी ग्रुपने त्यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री.योगेश पेढांबकर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून, भविष्यातही त्यांनी न्याय, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा चिपळूण नगर परिषद चे उपनगराध्यक्ष सौ.दांडेकर यांनी दिल्या.

सत्काराला उत्तर देताना योगेश पेढांबकर म्हणाले, “हा सन्मान माझा नसून समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आहे. यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून भविष्यातही सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी आणि समाजसेवेसाठी मी अधिक ताकदीने कार्यरत राहीन.” यावेळी त्यांनी दृष्टी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

सदर कार्यक्रमाला दृष्टी ग्रुप पेठ मागचे विद्यमान अध्यक्ष ॲड.श्री जीवन रेळेकर, माजी नगराध्यक्ष सौ.गौरी रेळेकर, लायन्स क्लबचे अध्यक्षा व व दृष्टी ग्रुपच्या संचालक सौ. प्रणिता कपडेकर, चिकू नगर परिषद उपनगराध्यक्ष सौ. दांडेकर मॅडम, तसेच चिपळूण तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर व असंख्य नागरिक उपस्थित होते

 

*फोटो* :

चिपळूण पेठमाप येथील दृष्टी ग्रुपच्या वतीने श्री.योगेश तानू पेढांबकर यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना ॲड.जीवन रेळेकर, चीपण नगरपरिषद उपनगराध्यक्ष सौ दांडेकर, माजी नगराध्यक्ष सौ. गौरी रेळे, चिपळूण लायन्स क्लबचे अध्यक्ष व दृष्टी ग्रुप संचालक सौ.प्रणिता कपडेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup
1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें