नाटे गावात शिवसेनेचा मोठा पक्षप्रवेश; दोन ग्रामपंचायत सदस्या, शाखाप्रमुखांसह शेकडो ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

rv ad

नाटे गावात शिवसेनेचा मोठा पक्षप्रवेश; दोन ग्रामपंचायत सदस्या, शाखाप्रमुखांसह शेकडो ग्रामस्थांचा आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का; विकासकामांवरील विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राजापूर, २५ जुलै : राजापूर–लांजा–साखरपा मतदारसंघात आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत नाटे गावात शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. नाटे ठाकरेवाडी, पडवणे, नाटे बाणेवाडी, थळेश्री आणि मिराशीवाडी येथील शेकडो ग्रामस्थांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन ग्रामपंचायत सदस्या आणि शाखाप्रमुख यांनी शिवबंधन बांधत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेशामध्ये ग्रामपंचायत सदस्या ज्योती मयेकर आणि प्रांजल लकळे, शाखाप्रमुख चंद्रकांत मिराशी, आंबोळगडचे माजी उपसरपंच शत्रुघ्न वाडेकर, ज्येष्ठ समाजसेवक विश्वास भाई करंगुटकर, अनिल नार्वेकर यांच्यासह विविध वाड्यांतील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत यांच्यासोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुका प्रमुख दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, जिल्हा परिषद सदस्या कोमल नवाळे, पंचायत समिती सदस्या जान्हवी गावकर, चंद्रकांत पड्यार, रवींद्र नागरेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, “शिवसेना हा सामान्य जनतेचा पक्ष आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांच्या समस्या समजून घेऊन तातडीने मार्ग काढणे आणि विकासकामांना गती देणे, हीच आमची कार्यपद्धती आहे. विकासाचा ध्यास आणि कामाचा वेग हीच आमच्या कार्याची खरी ओळख आहे.”

कार्यक्रमानंतर आमदार सामंत यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत विविध विकासकामांबाबतच्या मागण्या आणि निवेदने स्वीकारली. अनेक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत काही प्रकरणांमध्ये जागेवरच कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जनतेची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पक्षप्रवेशामुळे नाटे परिसरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट झाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला असून, या सोहळ्यामुळे स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याची चर्चा सुरू आहे.


बातमीदार – प्रशांत पोवार 

 


SEO कीवर्ड्स:
नाटे गाव शिवसेना प्रवेश, किरण सामंत, राजापूर बातमी, लांजा साखरपा मतदारसंघ, शिवसेना पक्षप्रवेश, ग्रामपंचायत सदस्या शिवसेना, राजापूर राजकारण, Ratnagiri News, Kiran Samant News, Shiv Sena Rajapur.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें