लांजा बस स्थानकाबाहेर आक्रमक गायीसह मोकाट गुरांचा सुळसुळाट; प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लांजा बस स्थानकाबाहेर आक्रमक गायीसह मोकाट गुरांचा सुळसुळाट; प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वासराचे संरक्षण करत गाय पादचाऱ्यांच्या अंगावर धावते; प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करण्याची प्रवासी व ग्रामस्थांची मागणी

 

बातमी:- जितेंद्र चव्हाण 

लांजा : लांजा बस स्थानकाच्या बाहेरील परिसरात सध्या दहा ते बारा मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे प्रवासी, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे नुकतेच वासरू दिलेली एक गाय आपल्या वासराच्या संरक्षणासाठी अत्यंत आक्रमक बनली असून, परिसरातून जाणाऱ्या लहान मुलांसह पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

बस स्थानकाबाहेरील मुख्य रस्त्यावर ही मोकाट गुरे आणि आक्रमक गाय वासरासह कायमस्वरूपी ठाण मांडून बसत असल्याने वाहतूक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर दिवसभर शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असल्याने एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी तसेच प्रवाशांनी बस स्थानक परिसरात वावरताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

दरम्यान, एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वीच स्थानिक प्रशासनाने मोकाट गुरांचा आणि आक्रमक गायीचा तातडीने सुरक्षित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी लांजा तालुक्यातील प्रवासी, व्यापारी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून बस स्थानक परिसर सुरक्षित करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें