NEET Paper Leak: गुहागरमध्ये नीट पेपर फुटी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

NEET Paper Leak: गुहागरमध्ये नीट पेपर फुटी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

 

आम्ही गुहागर कर या व्यासपीठावर एकत्रित येत तरुणाई ने दिली साद….. सामाजिक कार्यकर्ते सामील.

 

गुहागर (विशेष प्रतिनिधी):

दिल्लीत परीक्षा घोटाळ्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्यानंतर, या संघर्षा दरम्यान आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या या लढाऊ बाण्याला अभिवादन करण्यासाठी ‘आम्ही गुहागरकर’ या बॅनरखाली गुहागरमधील सर्व विद्यार्थी, पालक, नागरिक व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने एकत्र येत श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला.

सोमवारी सकाळी गुहागर येथील **छत्रपती शिवाजी महाराज चौक** येथे या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गुहागर तालुक्यातील सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत….

“आपली एकजुट, आपली संवेदना, आपली जबाबदारी हाच खरा गुहागरचा अभिमान”असल्याचे दाखवून दिले.

यावेळी उपस्थितांनी व मान्यवर वक्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त मानून त्या पूर्ण केल्याबद्दल शासनाचे आभारही व्यक्त केले.

*मान्यवरांची उपस्थिती:

या श्रद्धांजली कार्यक्रमासाठी मनसे चे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, प.सं.सदस्य संदीप गोरीवले, मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जाणवलंकर, आमिश कदम, उपसरपंच असीम साल्हे, पंकज बिर्जे, संतोष सोलकर, सोहम सातार्डेकर,आरे सरपंच समित घाणेकर,अमित कुबडे, अजित बेलवलकर, साबीर भाई साल्हे, सुदेश हडकर, पंकज दळवी, भूषण पवार, मृणाल रूमडे, अमोल जामसुतकर यांच्यासह तालुक्यातील अनेक नागरिक व राजकीय-सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें