मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना प्रातिनिधिक स्वरूपात सॅटेलाईट फोनचे वितरण करण्यात आले.
मुंबई -मच्छिमारांना समुद्रात आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी, हवामान आणि सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात, यासाठी सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सॅटेलाईट फोनमुळे मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातही संपर्क साधणे शक्य होणार असून खराब हवामान, यांत्रिक बिघाड, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर संकटांच्या वेळी तात्काळ मदत मागवणे सुलभ होणार आहे. मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने हा पुढाकार घेतला आहे. यावेळी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी ग्लोबल सॅटेलाईट फोन सर्व्हिस (GSPS) चे सादरीकरण करून समुद्रातील दुर्गम भागातही सातत्यपूर्ण संपर्क कसा करता येईल, याची माहिती दिली.
यावेळी मंत्री नितेश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.










