वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; समाजरत्न उमेश खैर यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
४० व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, विक्रमी रक्तदात्यांचा गौरव; ‘रक्तदान हेच जीवनदान’चा संदेश
प्रतिनिधी | मंगेश जाधव
पालपेणे गावचे सुपुत्र, जिल्हाभर रक्तदाता म्हणून विशेष ओळख असलेले तसेच अनेक सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित समाजरत्न श्री. उमेश रमेश खैर यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उमेश खैर यांच्या रक्तदान चळवळीतील सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव केला.
यावेळी विक्रमी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. १२१ वेळा रक्तदान करणारे बंधू कोळवणकर, १०१ वेळा रक्तदान करणारे विजू आप्पा कदम, ५६ वेळा रक्तदान करणारे शाहीद गोलंदाज, ५५ वेळा रक्तदान करणारे ललित काशीकर, शरद साळवी आणि दीपक दळी, ३६ वेळा रक्तदान करणारे रवींद्र पालकर तसेच ३० वेळा रक्तदान करणारे संदीप धनावडे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले आणि उपस्थित मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला भवानी सभागृहचे रसिक संसारे, डॉ. राजेंद्र पवार, ॲड. संकेत साळवी, मनसे नेते प्रमोद गांधी, विक्रम चव्हाण, विनोद जाणवळकर, संतोष पडवेकर, महेंद्र महाडिक, नाना पालकर, सुदीप संसारे, शाहीद गोलंदाज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, वैभव आडदवडे, सुधीर टाणकर, वैभव पडवेकर, सरपंच मंगेश सोलकर, सरपंच नारायण आग्रे, पोलिस पाटील विशाल बेलवलकर, सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, असीम साल्हे, सुरेश सावंत, दिनेश चव्हाण, सत्यवान घाडे, गणेश किरवे, मनोज बावधनकर, उमेश शिंदे, आशिष कारेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
कोकण विभागीय अध्यक्ष प्रकाश शेठ साळवी, तुकाराम बाबा साळवी, अमोल पीरदनकर, दीपक शिरकर, रवींद्र साळवी, प्रदीप शिरकर, अमोल निवळकर, हरिश्चंद्र पडवेकर, बबन पडवेकर, पांडुरंग कुंभार, मंगेश बुरबाडकर, राजेंद्र समगिस्कर, महेश जामसुतकर, महेश पडवेकर, डॉ. निलेश कुंभार, नाना पालकर, सुधीर जामसुतकर, अनिल पडवेकर, विनोद सावरटकर, प्रमोद साळवी, दिगंबर पालकर, समगिस्कर गुरुजी, जनार्दन मालवणकर आदींनीही रक्तदान करून उपक्रमाला पाठिंबा दिला. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुभाष गुढेकर आणि गुहागर तालुकाध्यक्ष अरविंद पालकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
सुदेश हडकर, सुमित पडवेकर, सुचित असगोलकर, कुणाल गमरे, राहुल जाधव, रोहंता समगिस्कर, राकेश दाभोळकर, ओंकार खैर, विक्रम खैर, सुदेश गमरे, विशाल मांडवकर, अंतिम संसारे, पंकज दळवी, अमित कुबडे, योगेश खैर, अनंत पालकर, संदीप पडवेकर, कुलदीप खैर, राकेश सोलकर, गीतेश पडवेकर तसेच गुहागर तालुक्यातील समस्त मित्रपरिवाराने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
प्रत्येक घरात किमान एक रक्तदाता निर्माण व्हावा, गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्ताची कमतरता भासू नये, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदाते, मान्यवर, वैद्यकीय पथक, स्वयंसेवक, सहकार्य करणाऱ्या संस्था आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.










