.आबलोलीत श्रीराम मंदिर लुटिविरोधात ठाकरे सेनेची ‘रामरक्षा महाआरती’; आमदार भास्कर जाधवांसह कार्यकर्ते भक्तिरसात तल्लीन

आबलोलीत श्रीराम मंदिर लुटिविरोधात ठाकरे सेनेची ‘रामरक्षा महाआरती’; आमदार भास्कर जाधवांसह कार्यकर्ते भक्तिरसात तल्लीन

 

विठ्ठल रखुमाई मंदिरात शिवसैनिकांचा जल्लोष; आमदार भास्करशेठ जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव महाआरतीत दंग होऊन नाचले

बातमी:

आबलोली:- संदेश कदम.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुक्यातील आबलोली येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात “रामरक्षा महाआरती” मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडली. श्रीराम मंदिरातील १४ कोटींच्या कथित लुटिविरोधात ठाकरे सेनेच्या वतीने या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महाआरतीदरम्यान आमदार भास्करशेठ जाधव आणि ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव श्रीरामाच्या भक्तीत दंग होऊन शिवसैनिकांसह उत्साहाने नाचले. या आंदोलनात्मक महाआरतीला आबलोली व खोडदे परिसरातील महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख सचिन बाईत, तालुका सचिव विलास गुरव, विनायक मुळ्ये, माजी सभापती सौ. पूर्वीताई निमुणकर, रवींद्र आंबेकर, नरेश निमुणकर, जगदीश गडदे, रमेश नेटके (माऊली), अजित रेपाळ, रवींद्र रेपाळ, प्रवीण भंडारी, महेश दिंडे, प्रमोद नेटके, शरद साळवी, संतोष पालशेतकर, तृशांत सुर्वे, प्रथमेश निमुणकर, शिवाजी गुरसळे यांच्यासह ठाकरे सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिAत होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें