शासन प्रशासनाच्या प्रतीक्षेला कंटाळून कळझोंडी ग्रामस्थांचा पुढाकार; लोकसहभागातून साकवाचे काम पूर्ण

*शासन प्रशासनाच्या प्रतीक्षेला कंटाळून कळझोंडी ग्रामस्थांचा पुढाकार; लोकसहभागातून साकवाचे काम पूर्ण*

*रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे*

रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील कुंभवणे वाडी येथील नदीवरील वर्षानुवर्षे नादुरुस्त असलेल्या साकवाचे काम अखेर ग्रामस्थांनी लोकसहभागातून पूर्ण केले. शासन प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करूनही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत आर्थिक नियोजन करून साकवाचे काम पूर्णत्वास नेले.

कळझोंडी-कुंभवणे वाडी परिसरातील नागरिकांसाठी हा साकव अत्यंत महत्त्वाचा असून, नादुरुस्त अवस्थेमुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. साकव नव्याने बांधण्यात यावा यासाठी ग्रामस्थांकडून शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी एकजूट दाखवत लोकसहभागातून हा प्रश्न मार्गी लावला.

ग्रामस्थांनी स्वतः आर्थिक नियोजन करून केलेले हे काम परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. गावातील नागरिक एकजुटीने पुढे आले तर स्थानिक पातळीवरील अनेक प्रश्न मार्गी लावता येतात, याचे कळझोंडी ग्रामस्थांनी जिवंत उदाहरण घालून दिले आहे.

या नव्याने पूर्ण झालेल्या साकवाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गवाणकर यांच्या हस्ते आनंदमय वातावरणात करण्यात आले. यावेळी परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि लोकसहभागाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें