बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; भीषण अपघातात १७ वर्षीय तरुण गंभीर

बेलापूरच्या पारसिक हिलवरून थेट रेल्वे रुळावर कोसळली कार; भीषण अपघातात १७ वर्षीय तरुण गंभीर

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

बेलापूर येथील पारसिक हिल डोंगरावरून एक कार थेट खाली रेल्वे रुळावर कोसळल्याची थरारक घटना घडली आहे. या अपघातात कारमधील १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

ही दुर्घटना बेलापूर रेल्वे स्थानकानुसार पारसिक हिल बोगद्याच्या पुढील बाजूस घडली. भरधाव कार उंचावरून खाली पनवेल-उरण मार्गिकेवरील रेल्वे रुळावर जाऊन आदळली, ज्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुळावर पडलेली दुर्घटनाग्रस्त कार बाजूला करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

 

या अपघातामुळे हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत व ठप्प झाली होती. कार डोंगरावरून खाली नेमकी कशी कोसळली? याबाबतचा सखोल तपास आता नवी मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून संयुक्तपणे केला जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें