*शृंगारतळी येथील नामवतं डॉ. राजेंद्र पवार यांची सुकन्या डॉ. ऋषिता राजेंद्र पवार हिचा मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांच्या वतीने सत्कार*
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील विष्णूपंत पवार मेमोरियल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा व जिल्ह्यातील नामवंत डॉ. राजेंद्र पवार यांची सुकन्या डॉ. ऋषिता राजेंद्र पवार हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सत्कार केला . डॉ.ऋषिता राजेंद्र पवार हिने वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. पदवी संपादन केली आहे.. डॉ.ऋषिता यांना गुहागर तालुक्यामध्ये वैद्यकीय सेवा करून आपले वडील डॉ. राजेंद्र पवार यांच्यासारखी तालुक्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांची सेवा करावयाची आहे. यावेळी सत्कार करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.












