जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांवर मद्यपानाचा अड्डा? ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही सूचना फलक नाही

highlits

*जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांवर मद्यपानाचा अड्डा? ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही सूचना फलक नाही

*रत्नागिरी प्रतिनिधी : निलेश रहाटे

गावातील जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या JSWच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या दोन बंधाऱ्यांच्या परिसरात मद्यपान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आरटीआय कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे यांनी या दोन्ही बंधाऱ्यांची पाहणी केली असता हा प्रकार निदर्शनास आला. पाहणीदरम्यान परिसरात दारूच्या बाटल्या, बिअरचे टिन तसेच क्वार्टरच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे दिसून आले.

 

यातील दोन्ही बंधारे ग्रामपंचायतीच्या हाकेच्या अंतरावर असून दुसरा बंधारा बोरकर यांच्या घराजवळ बांधण्यात आलेला आहे. बोरकर यांच्या घराजवळील बंधाऱ्याच्या ठिकाणी गावातील काही व्यक्ती मद्यपान करताना दिसून आल्याचे सांगण्यात आले. व दुसऱ्या बंधाऱ्या वरती परप्रांतीय नागरिक दिसून आले तसेच परिसरातील इतर ठिकाणीही दारूच्या बाटल्या व बिअरचे टिन आढळून आले आहेत.

 

विशेष म्हणजे, हा प्रकार यापूर्वीही मी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. वेळोवेळी फोटोद्वारे ग्रामसेवक व सरपंच यांना वस्तुस्थिती दाखवण्यात आली होती. तसेच बंधाऱ्यांच्या ठिकाणी “येथे मद्यपान करू नये” अशा आशयाचा सूचना फलक लावण्यात यावा, अशी विनंतीही करण्यात आली होती.

 

मात्र, वारंवार तक्रारी, विनंत्या आणि अर्ज करूनही आजपर्यंत दोन्ही बंधाऱ्यांच्या ठिकाणी कोणताही सूचना फलक लावण्यात आलेला दिसत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या अगदी जवळ असलेल्या सार्वजनिक जलसंधारणाच्या ठिकाणी अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना का करण्यात आलेल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

निवडणुकीत ग्रा.पं वर झेंडे फडकतील; पण नागरिकांच्या तक्रारींचे काय?

 

आता आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकीची चाहूल लागेल, ग्रामपंचायत कार्यालयावर पक्षाचे निवडणुकीचे झेंडे फडकतील, प्रचाराची लगबग सुरू होईल. मात्र, नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी, विनंती अर्ज आणि फोटोच्या माध्यमातून एखादा प्रश्न मांडल्यानंतरही त्यावर योग्य ती कार्यवाही होत नसेल, तर हे झेंडे नेमके कोणत्या लोकशाही जबाबदारीचे प्रतीक आहेत, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.

 

निवडणुकीच्या काळात झेंडे फडकवणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे; परंतु लोकशाहीची खरी परीक्षा नागरिकांच्या तक्रारींवर प्रशासन किती तत्परतेने कार्यवाही करते यात असते. नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असेल तर केवळ निवडणुकीच्या काळात झेंडे लावून लोकशाहीची जबाबदारी पूर्ण होत नाही, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.

 

जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या या बंधाऱ्यांचा उद्देश पाणी साठवणूक, भूजल पातळी वाढवणे आणि शेतीला फायदा मिळवून देणे हा आहे. अशा सार्वजनिक सुविधांच्या परिसरात मद्यपान करून बाटल्या व कचरा टाकला जात असल्यास त्याचा स्वच्छतेवर आणि सार्वजनिक मालमत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे ग्रामपंचायतीने दोन्ही बंधाऱ्यांच्या ठिकाणी तातडीने सूचना फलक लावावेत, परिसराची नियमित पाहणी करावी, स्वच्छता राखावी आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान होत असल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

 

फोटोद्वारे यापूर्वीही वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतरही सूचना फलकाची मागणी प्रलंबित राहिल्याने आता ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का, की पुन्हा एकदा तक्रार अर्ज कागदावरच राहणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें