देवरुख-तेलीवाडी व भोरपवणे गावातील दुष्काळग्रस्त शेतीचे कृषी विभागाकडून थेट बांधावर जाऊन पंचनामे

**देवरुख-तेलीवाडी व भोरपवणे गावातील दुष्काळग्रस्त शेतीचे कृषी विभागाकडून थेट बांधावर जाऊन पंचनामे

**देवरुख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख-तेलीवाडी व भोरपवणे येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे कृषी विभागाच्या वतीने थेट बांधावर जाऊन युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे, मा. ना. रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच माजी आमदार श्री. प्रमोदजी जठार, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी यादव, जिल्हा परिषद गटनेते व उपाध्यक्ष श्री. प्रमोदजी अधटराव, श्री. अभिजितजी शेट्ये, तालुकाध्यक्ष श्री. रुपेशजी कदम आणि शहराध्यक्ष श्री. सुशांतजी मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा पंचनामा दौरा आयोजित करण्यात आला होता.

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. तुकाराम किर्वे आणि माजी नगरसेविका सौ. रेश्मा तुकाराम किर्वे यांच्या पुढाकारातून व प्रमुख उपस्थितीत हा संयुक्त पाहणी दौरा पार पडला. यावेळी कृषी अधिकारी सौ. शिसाळ मॅडम व सौ. वेल्ये मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि वस्तुनिष्ठ पंचनामे नोंदवून घेतले. कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत दिलासादायक मार्गदर्शन केले.

या पाहणी दौऱ्यावेळी शेतकरी बांधव श्री. अशोक जयराम किर्वे, श्री. शिवराम गणपत किर्वे, श्री. विजय केशव कोठावले, श्री. सुरेश विठोबा कोठावले, श्री. पांडुरंग शंकर किर्वे, श्री. धनंजय लक्ष्मण किर्वे, श्री. रवींद्र कृष्णा किर्वे, श्री. सतीश सुरेश किर्वे, श्री. कृष्णा रामचंद्र किर्वे यांच्यासह महिला शेतकरी सरस्वती सकपाळ, सुमित्रा आत्माराम किर्वे, सुरेखा सीताराम किर्वे, शारदा गंगाराम पवार, लक्ष्मी विष्णू किर्वे, मालती मुकुंद किर्वे, सुवर्णा अनंत किर्वे, अर्चना अनंत किर्वे, सविता संतोष किर्वे, स्वाती रामदास किर्वे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे यावेळी श्री. तुकाराम किर्वे व सौ. रेश्मा किर्वे यांनी सांगितले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें