*गुहागर येथे सेवा पखवाडा कार्यक्रम संपन्न
गुहागर–
जिल्हा युवा समन्वयक आदरणीय सम्राट पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली माय युवा भारत रत्नागिरी तर्फे महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान तालुका गुहागर व श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर यांच्या सहकार्याने स्वच्छता पखवाडा कार्यक्रमांतर्गत गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला. त्यावेळी गुहागर एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन माननीय श्री सुरेश दादा सावंत साहेब, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे संचालक, गुहागरचे केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील, प्राचार्य सुजाता कांबळे मॅडम, उपप्राचार्य मनीषा सावंत मॅडम ,अनगुडे सर ,भाटकर मॅडम ,गुहागर मधील प्रतिष्ठित नागरिक व कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. त्यावेळी गुहागर बीचची साफसफाई करण्यात आली. व समुद्रकिनारा प्लॅस्टिक मुक्त करण्यात आला. मान्यवरांच्या शुभहस्ते परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले . सदर उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे नियोजन गुहागरचे केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील व प्राचार्य सुजाता कांबळे मॅडम व उपचार या मनीषा सावंत मॅडम यांनी केले












