किल्ले धर्मवीरगडचे सरपंच कै. देविदास काका राजेशिर्के यांचे ११ ऑक्टोबर रोजी प्रथम पुण्यस्मरण

*किल्ले धर्मवीरगडचे सरपंच कै. देविदास काका राजेशिर्के यांचे ११ ऑक्टोबर रोजी प्रथम पुण्यस्मरण ;*

 

*समाजसेवी व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणा निमित्त किर्तनाचे आयोजन ;*

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अ नगर जिल्ह्यातील मौजे पेडगांव, ता. श्रीगोंदा, किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे आदर्श व्यक्तिमत्त्व, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहिल्यानगर “जिल्हा उपाध्यक्ष” व पेडगाव, किल्ले धर्मवीरगडचे माजी उप सरपंच पैलवान कै. देविदास (काका) गणपतराव राजे शिर्के यांचे “प्रथम पुण्यस्मरण” घटस्थापने दिनी रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ठिक ९:०० वाजता आयोजित केले असून पुण्यस्मरणा निमित्त अवधूत पिठ दत्त संस्थान कर्जतचे किर्तनकार ह.भ.प. रोहित महाराज नांगरे यांचे सकाळी १०:०० वा. किर्तन होणार आहे. तरी सर्व सगेसोयरे, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन राजेशिर्के परिवाराने केले आहे.

 

सरपंच कै. देविदास राजे शिर्के यांना लहाना थोरांमधून आदराने ‘काका’ नावाने ओळखले जायचे, अगदी कमी वयातच त्यांनी गावातील शेकडो मुलांना सोबत घेत “शंभुराजे ग्रुपची” स्थापना करुन “छत्रपती शंभुराजे चौकात” गणेशोत्सवाची सुरुवात करून धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्याचा श्रीगणेशा केला होता. आपल्या ऐतिहासिक घराण्याचा आलेला वारसा तसेच आजोबा व आपले वडील चेअरमन स्वर्गीय पैलवान गणपतराव राजे शिर्के यांच्या पावलावर पाऊल टाकत कुस्तीसह सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रवेश करत सामाजिक कार्यास प्रारंभ केला होता. श्रीगोंदा तालुक्यासह गावातील लहाना थोरांच्या मनामनात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण झालेले नेतृत्व व समाजसेवी व्यक्तिमत्व होते.

 

देविदास काकांनी श्रीगोंदा तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, सोसायटी अशा अनेक निवडणुका लढविल्या होत्या. त्यांनी ऐतिहासिक पेडगाव गावातील किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) संवर्धन कार्यासह दुर्लक्षित मंदिरं बांधण्या बरोबरच, धार्मिक, सामाजिक कार्यासाठी निधी, देणगी देण्यासाठी ते कायमच पुढे असत, तसेच गोर-गरीबांसह गरजवंताला आर्थिक मदत देणे, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, क्रिकेट स्पर्धांमध्ये ते नेहमी अग्रस्थानी असायचे. पैलवानकी केली असल्याने त्यांनी कुस्ती क्षेत्रात चांगलाच नावलौकीक मिळवला होता, क्रिकेटमध्येही ते अष्टपैलू खेळाडू होते. अशा विविध सामाजिक राजकीय क्षेत्रात भरीव कार्य केल्याने ते विरोधकांच्याही मनावर ही राज्य करणारे दानशूर व्यक्तिमत्व ठरले होते.

 

कै. देविदास काका हे “भिमाकाठचा ढाण्या वाघ” म्हणून परिचित असलेले आदर्श व्यक्तिमत्व चेअरमन स्वर्गीय पैलवान गणपतराव राजे शिर्के यांचे धाकले सुपुत्र होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के, इतिहास अभ्यासक व पत्रकार लक्ष्मीकांत राजेशिर्के, सतिश राजेशिर्के यांचे धाकले बंधु होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगी, मुलगा यशराज राजेशिर्के, भावजया, चुलते, पुतणे, चुलत बंधु, चुलत भावजया, नातवंडे आदींसह मोठा राजेशिर्के परिवार आहे.

 

तसेच कै.देविदास काका हे श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. सचिव संपतराव राजेशिर्के, राष्ट्रवादीचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष व श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी सभापती हरिदास राजे शिर्के, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक दादासाहेब राजेशिर्के, गव्हर्नमेंट कॉंट्रॅक्टर हरिश्चंद्र राजेशिर्के, जालिंदर राजेशिर्के, कल्याणराव राजेशिर्के, हिरालाल राजेशिर्के, दत्तात्रय राजेशिर्के, रत्नाकर राजेशिर्के यांचे ते चुलत बंधु होत. राजेशिर्के घराण्याला ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय वारसा लाभला असून शंभुपत्नी महाराणी येसुबाई (माँ राजाऊ साहेब) यांचे वडिल स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराव राजे शिर्के व येसुबाईंचे थोरले बंधु स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराव राजे शिर्के यांचे वंशज घराणे असल्याने या घराण्याला राज्यभरात मोठी प्रतिष्ठा, ओळख व मानसन्मान आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें