शिक्षक स्वप्निल वनारे राज्यस्तरीय विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित

*शिक्षक स्वप्निल वनारे राज्यस्तरीय विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित*

आबलोली (संदेश कदम)

श्रीमान चंदुलालशेठ हायस्कूलचे हुरहून्नरी शिक्षक स्वप्निल वनारे यांना नुकतेच राज्यस्तरीय विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा भरणे येथील गणेश मंगल कार्यालय येथे उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला.

यावेळी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते वैभव खेडेकर, नगरसेविका वैभवी खेडेकर, रीजनल टीचर्स ऑर्गनायझेशन दापोलीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, उपाध्यक्ष भरत पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी, रत्नागिरी जिल्हा संघटक विपुल देसाई, जिल्हाध्यक्ष संजय भागवत, सचिन बेर्डे, बाळासाहेब नकाते आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

शिक्षक स्वप्निल वनारे हे गेली 25 वर्ष चंदुलालशेठ हायस्कूल व जुनियर कॉलेजमध्ये अध्यपनाचे काम पाहतात शाळेतील विविध उपक्रमात त्यांचा हिरोनी सहभाग असतो. विविध स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. शिक्षक स्वप्निल वनारे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल चेअरमन राजेश बुटाला, संस्थेचे अध्यक्ष डॉ.उपेंद्र तलाठी, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, माजी चेअरमन ना. बा. शेलार, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक धोत्रे, शिक्षक गोविंद राठोड, पर्यवेक्षक उत्तम कांबळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें