चिपळूणमध्ये निवडणूक आयोग आणि सरकारविरोधात दणदणीत भव्य मोर्चा..

चिपळूणमध्ये निवडणूक आयोग आणि सरकारविरोधात दणदणीत भव्य मोर्चा..

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी चिपळूण महाविकास आघाडीतर्फे आज, बुधवारी रणरणत्या उन्हात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.

 

शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसैन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर जीप्सी कॉर्नरसमोर झालेल्या सभेत आमदार भास्कर जाधव, माजी खासदार हुसैन दलवाई आदींची तडाखेबंद भाषणे झाली. त्यानंतर हातात तिरंगा ध्वज घेऊन आणि सरकारविरोधी घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली.

 

चिंचनाका-भोगळेमार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर दाखल झाला. तेथे मान्यवर नेत्यांनी प्रांताधिकारी आकाश लिंगाडे यांच्यासमोर आपली भूमिका मांडून रीतसर निवेदन सादर केले. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनल लक्ष्मी घाग, आशिष जाधव, भरत लबधे, ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव, बाळा कदम, फैसल कास्कर, बळीराम गुजर, सुभाष जाधव, सचिन चोरगे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, जिल्हाध्यक्ष बारक्या बने, तालुकाध्यक्ष अविनाश केळसकर, शिरीष काटकर, इम्तियाज मुकादम, अक्षय केदारी यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

चिपळूणचे डीवायएसपी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली शहरात उत्तम पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उन्हाची काहिली असतानाही या मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें