पावसाअभावी भात शेती संकटात; गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकरांची बांधावर जाऊन पीक पाहणी

पावसाअभावी भात शेती संकटात; गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकरांची बांधावर जाऊन पीक पाहणी

प्रतिनिधी (मंगेश जाधव)

गुहागर -यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने गुहागर तालुक्यातील भात शेतीवर संकट ओढावले आहे. अनेक ठिकाणी भात पिकाची वाढ खुंटली असून जमिनीला भेगा पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

 

या पार्श्वभूमीवर गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी आज सकाळी निवोशी गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अनेक शेतांमध्ये भाताचे पीक करपल्याचे तसेच उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले.

 

सभापती पोळेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच उपस्थित तलाठी आणि कृषी सहाय्यकांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

 

नुकसानीचा सविस्तर अहवाल तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार, अशी ग्वाही सभापती प्रणव पोळेकर यांनी दिली.

 

या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ तसेच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें