स्नेहबंध मंच तर्फे आदिवासी कातकारी समाजास दिवाळी फराळ वाटप

*स्नेहबंध मंच तर्फे आदिवासी कातकारी समाजास दिवाळी फराळ वाटप

 

चिपळूण–

स्नेहबंध मंच चिपळूण या सामाजिक संस्थेमार्फत कालुस्ते ता. चिपळूण येथील डोंगरावर वसलेल्या कातकरी समाजाच्या 10 कुटुंबाना दिवाळी सणाच्या पूर्व संधेला मोती साबण, खोबरेल तेल बाटली, उटणे पाकीट, पावंडर डबा, टॉवेल, साडया व दिवाळी फराळ असे साहित्य प्रत्यक्ष त्यांच्या वस्तीवर जावून वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम स्नेहबंध मंचचे अध्यक्ष सीताराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तर उपाध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी सचिव विकास ढवण, संचालक प्रकाश सावर्डेकर, विजय थोरे, विलास सकपाळ, व नगर सेविका नसरीन खडस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला.

 

या दिवाळी साहित्य व फराळ वाटपाचा लाभ मंगेश निकम, महेश निकम, योगेश निकम, सुनिल निकम,

 

संजय निकम, उमेश जगताप, मंगेश जगताप, सुनिल पवार, दिनेश निकम यांनी घेतला. स्नेहबंध मंचच्या उपस्थित मान्यवरांनी तुमची मुले शाळेत पाठवा, त्यांना शिक्षण द्या. तुम्ही तरुण तरुणींनी चिपळूण परिसरातील उद्योग व्यवसायामध्ये कामाला जावा गवंडी, वायरमन, रिपेअरींग सारखी कामे शिका. व आपली प्रगती करा. असा मोलाचा सल्ला दिला. आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हांला कामावर ठेवण्यासाठी सहकार्य करू. नुसते जंगलात फिरून आयुष्य घालवू नका असे मोलाचे मार्गदर्शन केले. सदर स्नेहबंध मंच हे सामाजिक व शैक्षणिक संस्था असे गेली 2 वर्षे अनेक उपक्रम राबववित आहेत. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें