<,ओम साई भजन मंडळाच्या १८ व्या वर्धापन दिनाचा भक्तिमय सोहळ्याचे आयोजन
प्रतिनिधी (मंगेश जाधव)
वारकरी संप्रदायाचा गौरवशाली वारसा आणि संतपरंपरेची भक्तिमय शिकवण जपत, दैनंदिन रेल्वे प्रवासात सामूहिक नामस्मरणाची गोडी निर्माण करण्याचे पवित्र कार्य ओमसाई भजन मंडळ गेल्या १८ वर्षांपासून निष्ठेने करीत आहे. धकाधकीच्या प्रवासातही भक्ती, नामस्मरण आणि अध्यात्माची ज्योत तेवत ठेवत, रेल्वे प्रवासाला भक्तिमय स्वरूप देण्याची ही अनोखी परंपरा मंडळाने अखंडपणे जोपासली आहे. वारकरी संप्रदायाचा हा तेजस्वी व पवित्र वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जात आहेत. या सेवाकार्याचा १८वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध भक्तिमय कार्यक्रमांच्या आयोजनाने उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था (रजि.) आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली रेल्वे प्रवासी भजन सामाजिक संस्था (रजि.) यांच्याशी संलग्न असलेल्या या मंडळाने या निमित्ताने चतुर्थ भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा, श्री सत्यनारायण महापूजा आणि नामरुपी कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा भक्तीरसात न्हालेला सोहळा साईछाया विद्यालय, विरमाता जिजाई नगर, विरार रोड, मोरेगाव, नालासोपारा पूर्व येथे पार पडणार आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी ७.०० वाजता कीर्तनकर ह.भ.प. रोहीत महाराज आग्रे (चिपळूण) यांचे श्रवणीय आणि समाजमनाला जागं करणारे नामरुपी कीर्तन होणार आहे. या कीर्तनाला श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय नालासोपारा यांची भक्कम कीर्तन साथ लाभणार असून ह.भ.प. सोनु महाराज येद्रे (खेड), ह.भ.प. राजेश जाधव (दापोली) आणि पखवाज साथ ह.भ.प. विशाल सुतार (खेड) यांच्या सुमधुर साथीने हा सोहळा अधिकच रंगणार आहे.
एक ८&दिवसभराचा भक्तिमय कार्यक्रम – सोहळ्याची सुरुवात पहाटेपासूनच मंगलमय वातावरणात होणार असून सकाळी A वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ८.३० वा. दिप प्रज्वलन, सकाळी ८.४५ वा. पंचपदी आणि सकाळी ९.०० वा. मुख्य भजन स्पर्धेला सुरुवात होईल. दुपारी १.०० ते ३.०० वा. सर्व भक्तांसाठी भोजन समारंभ, दुपारी २.०० ते ३.०० वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ९.०० वा. मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि रात्री ९.३० वा. दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे.
रेल्वे प्रवासी भजन मंडळांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेत विशेष आकर्षक रोख रक्कम आणि सन्मानचिन्हे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये सांघिक गटासाठी प्रथम क्रमांक ९०२६/- रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ७०२६/- रुपये व चषक आणि तृतीय क्रमांक ५०२६/- रुपये व चषक प्रदान केले जातील. उत्तेजनार्थ गटासाठी प्रथम क्रमांक ४०२६/- रुपये व चषक, द्वितीय क्रमांक ३०२६/- रुपये व चषक आणि तृतीय क्रमांक २०२६/- रुपये व चषक देण्यात येतील. याशिवाय वैयक्तिक कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट गायक, चकवा, डफली, रिदम आणि कोरस या प्रत्येक विभागासाठी १५२६/- रुपये व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.या कार्यक्रमासाठी अनेक संत सेवा भजन सामाजिक संस्था व नामवंत मंडळ सहभागी होणार आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक श्री. अशोक मेस्त्री काका, श्री. मनोज साटम, जेष्ठ कार्यकारी अधिकारी/उपाध्यक्ष श्री. शशिकांत साळवी, अध्यक्ष ह.भ.प. श्री. शंकर माळी, उपाध्यक्ष श्री. नितेश पवार, सचिव श्री. वैभव रांजणे, उपसचिव कु. कल्पेश पाटकर, खजिनदार श्री. मनोहर साळवी, उपखजिनदार श्री. गणेश पालकर, कार्याध्यक्ष ह.भ.प. श्री. मयूर सावंत, उपकार्याध्यक्ष श्री. संदिप चव्हाण, सल्लागार श्री. समीर घागरे व श्री. राजेश गावनंग, हिशोब तपासणीस श्री. गणेश घाडी व श्री. तातोबा साळवी, संपर्क प्रमुख श्री. गौरव गाडे व श्री. समीर बोडस तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य (श्री. मकरंद चव्हाण, श्री. अमित पवार, श्री. सचिन कुडेकर, श्री. नरेश साळवी), मुख्य गायक (श्री. योगेश येलये, श्री. सुदर्शन शिगवण) आणि सर्व सभासद व हितचिंतक अहोरात्र परिश्रम घेत आहेत.अत्यंत नियोजनपूर्वक तयारी करत असून ” याची देही याची डोळा ” चला पाहुयात ओम साई भजन मंडळाचा वर्धापन दिन सोहळा तरी सर्व भजन प्रेमी, सहप्रवासी, सभासद, हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील समाज कार्यकर्त्यांनी सहकुटुंब उपस्थित राहून भजन स्पर्धा, कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले, ,, _*&. आहे.












