काळे फासले की टेपने नाव झाकले? वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नामफलकावरून वाद; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण!”

*काळे फासले की टेपने नाव झाकले? वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नामफलकावरून वाद; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण!”p

*रत्नागिरी प्रतिनिधी :- श्री निलेश रहाटे

रत्नागिरी तालुक्यातील वाटद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समितीच्या नामफलकावर ग्रुप वाटद मिरवणे ग्रामपंचायत मधील माजी सरपंच व जन आरोग्य समितीचे माजी सदस्य अमित वाडकर यांच्या नावावर काळे फासल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आला होता. या प्रकारामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असतानाच, प्रत्यक्षात नामफलकावर काळा रंग फासण्यात आला नसून नेव्ही ब्लू कलर रंगाची इन्सुलेशन टेप लावून नाव झाकण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

RTI कार्यकर्ता व पत्रकार निलेश रहाटे यांना मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद, ता. जि. रत्नागिरी येथील जन आरोग्य समितीमध्ये ग्रुप वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमित वाडकर हे सदस्य म्हणून कार्यरत होते. मात्र, त्यांनी सप्टेंबर २०२६ मध्ये आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये, “माझ्या वैयक्तिक कारणास्तव तसेच वेळेअभावी पदाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे मी माझ्या जन आरोग्य समिती सदस्य पदाचा राजीनामा स्वखुशीने देत आहे,” असे स्पष्ट नमूद केले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

राजीनाम्यानंतर नाव झाकण्याबाबत तक्रार संबंधित सदस्याने स्वखुशीने राजीनामा दिल्यानंतरही जन आरोग्य समितीच्या नामफलकावर त्यांचे नाव कायम असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्या नावासमोरील पदासह पूर्ण नाव नेव्ही ब्लू कलर रंगाच्या इन्सुलेशन टेपने झाकण्यात आले होते. त्यामुळे फलकावर थेट काळा रंग फासण्यात आला, असा आरोप माजी सरपंच हयांनी केला होता आणि प्रत्यक्षात टेपने नाव झाकण्याची केलेली कार्यवाही या दोन वेगळ्या बाबी असल्याचे समोर येत आहे.

 

*अमित वाडकर यांची विडिओ द्वारे कारवाईची मागणी*

 

दरम्यान, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये अमित वाडकर यांनी आपल्या नावावर काळे फासण्यात आल्याचा आरोप केला असून, अशा प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

 

*वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष केदारी यांची भूमिका*

 

या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष केदारी यांनी स्पष्ट केले की, संबंधित सदस्याने सप्टेंबर २०२६ मध्ये राजीनामा दिल्याची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात लेखी स्वरूपात उपलब्ध आहे. राजीनाम्यानंतरही नामफलकावर संबंधित सदस्याचे नाव असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्या पूर्ण नावासह पद झाकण्यासाठी उपलब्ध असलेली नेव्ही ब्लू कलर रंगाची इन्सुलेशन टेप वापरण्यात आली आहे. नामफलकावर कुठेही काळा रंग फासण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

सोशल मीडियावरील अश्या आरोपांमुळे आरोग्य केंद्राची व समिती ची प्रतिमा मलिन होत आहे.

 

जन आरोग्य समिती ही सार्वजनिक आरोग्य सेवेशी संबंधित समिती असून, तिच्या नामफलकाबाबत निर्माण झालेला वाद वस्तुस्थितीच्या आधारेच सोशल मीडिया वर मांडणे गरजेचे होते . एका बाजूला अमित वाडकर यांनी आपल्या नावावर काळे फासल्याचा आरोप करून कारवाईची मागणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळा रंग न वापरता केवळ इन्सुलेशन टेपने नाव झाकल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

 

त्यामुळे राजीनामा पत्र, रुग्णालयातील लेखी नोंद, संबंधित तक्रार आणि नामफलकावरील प्रत्यक्ष परिस्थिती या सर्व बाबींची पडताळणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक होते. सोशल मीडियावर अपूर्ण माहिती किंवा एकतर्फी आरोप प्रसारित करताना प्राथमिक आरोग्य केंद्र व जन आरोग्य समितीची प्रतिमा मलिन होणार नाही, याची माजी सरपंच अमित वाडकर हयांनी काळजी घेणे गरजेचे होते.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें