तवसाळ बाबरवाडीत पारंपरिक वाघबारस उत्सव उत्साहात साजरा; कोकणची संस्कृती जपण्याचा ग्रामस्थांचा पुढाकार

तवसाळ बाबरवाडीत पारंपरिक वाघबारस उत्सव उत्साहात साजरा; कोकणची संस्कृती जपण्याचा ग्रामस्थांचा पुढाकार

गुहागर : कोकणातील पारंपरिक सण-उत्सव आणि लोकसंस्कृतीचा अनमोल वारसा आजही ग्रामीण भागात जपला जात आहे. याच परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेला वाघबारस उत्सव गुहागर तालुक्यातील मौजे तवसाळ येथील बाबरवाडीमध्ये मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

 

अनेक वर्षांपासून चालत आलेली वाघबारसची परंपरा बाबरवाडीतील ग्रामस्थ आजही श्रद्धेने आणि उत्साहाने जोपासत आहेत. यंदाही सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात गावातील ज्येष्ठ मंडळी, महिला मंडळ तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

 

या उत्सवाच्या माध्यमातून जुन्या परंपरांना उजाळा देतानाच नव्या पिढीला कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीची ओळख करून देण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, मुंबई येथे वास्तव्यास असलेले बाबरवाडीचे कार्यकर्ते दीपक जोशी हे देखील वाघबारस उत्सव साजरा करण्यासाठी खास उपस्थित राहिले. त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.

 

आधुनिकतेच्या युगात अनेक पारंपरिक सण-उत्सव काळाच्या ओघात मागे पडत असताना तवसाळ बाबरवाडीतील ग्रामस्थांनी ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीनेही या उत्सवात घेतलेला सहभाग कौतुकास्पद ठरला.

 

परंपरेचे जतन, संस्कृतीचे संवर्धन आणि गावातील एकजूट यांचा सुंदर संगम म्हणजे तवसाळ बाबरवाडीचा वाघबारस उत्सव!

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें