भास्कर जाधवांच्या संघर्षाला यश! चिपळूण-गुहागर परिसरात नवी एमआयडीसी उभारण्यास मान्यता; हजारो तरुणांना मिळणार रोजगार

  , भास्कर जाधवांच्या संघर्षाला यश! चिपळूण-गुहागर परिसरात नवी एमआयडीसी उभारण्यास मान्यता; हजारो तरुणांना मिळणार रोजगार

गुहागर / चिपळूण: चिपळूण-गुहागर परिसरातील तरुणांना स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. या परिसरात नवी एमआयडीसी उभारण्यास शासनाने मान्यता दिली असून, प्रकल्पासाठी १०० एकर सलग जमीन उपलब्ध करून देण्याकरिता प्रांताधिकारी कार्यालयात स्वतंत्र खिडकी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

गुहागर-चिपळूण परिसरातील १४ गावांच्या औद्योगिक विकासासाठी यापूर्वी मंजूर झालेली एमआयडीसी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आमदार भास्कर जाधव यांनी हा विषय कधीही सोडला नाही. त्यांनी विधानसभेत सातत्याने आवाज उठवत शासनाला जाब विचारला आणि प्रत्येक स्तरावर या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू ठेवला.

उद्योगमंत्र्यांची सकारात्मक भूमिका आमदार भास्कर जाधव यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि हा विषय मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत नव्या एमआयडीसीच्या उभारणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा विषय मार्गी लावल्याबद्दल जाधव यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.

स्थानिकांच्या घरांना आणि फळबागांना धक्का नाही या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांची घरे, गावठाणे, मंदिरे आणि फळबागांना कोणताही धक्का न लावता औद्योगिक विकास साधण्याची भूमिका सर्वानुमते मान्य करण्यात आली आहे.

हजारो तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार “या एमआयडीसीच्या माध्यमातून आपल्या भागातील तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध व्हाव्यात, हीच माझी भूमिका आणि ध्येय आहे. संघर्ष सुरू ठेवला तर निर्णय बदलतात आणि जनतेच्या हितासाठी लढत राहिलो तर विकासाचे मार्ग खुले होतात,” अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें