रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभिकरण कामाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज लोकार्पण…

रेल्वे स्टेशन परिसराच्या सुशोभिकरण कामाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी लोकार्पण...

रत्नागिरी  (वार्ताहर) – रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभिकरण करणे या कामाचा लोकार्पण सोहळा उद्या बुधवार ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे, आमदार प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, डॉ. राजन साळवी, भास्कर जाधव, योगेश कदम, शेखर निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मनिषा पाटणकर-म्हैसकर, सचिव (रस्ते) सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य सदाशिव साळुंखे, सचिव (बांधकामे) सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य संजय दशपुते, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे कार्पोरेशन संतोष कुमार झा, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण शरद राजभोज, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें