कोतळूमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

कोतळूमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती कोतळूक व प्रोलाईफ हॉस्पिटल शृंगारतळी वतीने आयोजन.

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत कोतळूक, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती कोतळूक, डॉ सचिन, डॉ अश्विनी ओक यांच्या प्रोलाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने कोतळूक ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले.

शिबीरामध्ये कोतळूक गावातील १०५ जणांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक रूग्णांना मोफत ड्रॉप तसेच सवलतीच्या दरात चष्मे देण्यात आले. या शिबिरात ज्यांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे अशा २० रूग्णांना सवलतीच्या दरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. शिबिरात रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी तसेच नेत्र तपासणी डॉ अश्विनी ओक यांनी केली.

यावेळी कोतळूक ग्रामपंचायत सरपंच सौ प्रगती मोहिते, तंटामुक्त गाव समिती कोतळूक अध्यक्ष, कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, पोलिस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, विनोद शिगवण, शर्मिला भेकरे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल आगिवले, सचिन भेकरे, मानसी पवार, आसावरी बाधावटे, समीक्षा वाघे, गणपत शिगवण, लक्ष्मण शिगवण, प्रकाश मोहिते, दिपक मोरे, नितीन काटकर आदींसह ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कोतळूमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें