शिवजयंती उत्सव 2025: कोंडये येथे उत्साहात साजरी होणार!..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवजयंती उत्सव 2025: कोंडये येथे उत्साहात साजरी होणार!..

✍️राजू सागवेकर/करेल

▪️ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी शिवजयंती यंदा 19 फेब्रुवारी 2025 रोजी राजापूर तालुक्यातील कोंडये येथे भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

*कार्यक्रमाची प्रमुख रुपरेषा:*

📍 सकाळी 8.30 ते 9.00 – ग्रामदेवतेला पुष्पहार अर्पण
📍 सकाळी 9.30 ते 10.00 – छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण
📍 सकाळी 10.00 ते 12.00 – प्राथमिक शाळांचे विशेष कार्यक्रम
📍 दुपारी 3.00 ते 6.00 – महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ
📍 सायंकाळी 7.00 ते 9.00 – स्थानिक ढोल वादन
📍 रात्री 9.00 ते 10.00 – पोवाडा गायन
📍 रात्री 10.00 ते 1.00 – समई नृत्य (नाद, देवगड)

स्थळ: कोंडये, बस स्टॉप
दिनांक: 19 फेब्रुवारी 2025

▪️ ही शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी सर्व शिवभक्तांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

🔴 राजू सागवेकर 🔴 वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

Leave a Comment

आणखी वाचा...