प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ संपन्न मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते लाभार्थ्यांची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

????????

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ संपन्न

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते लाभार्थ्यांची निवड

मुंबई– प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉमध्ये या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन लहामुलांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्य उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या लकी ड्रॉमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील 17 विविध योजनांच्या एकूण 234 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण 89 कोटी 11 लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण 6 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 25 लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे. सर्वसाधारण गटातील प्रमोशन ऑफ रिक्रेशनल फिशरीज या 50 लक्ष रुपयांच्या योजनेचा लाभ एका लाभार्थ्याला देण्यात आला. मत्स्य तलाव जैविक प्रकल्प या 50 लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा लाभ अनुसुचित जमातीच्या 6 लाभार्थ्यांना आणि 32 महिला लाभार्थ्यींची निवड करण्यात आली. तसेच मत्स्य तलाव योजनेसाठी 6 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेमध्ये प्रत्येकी 25 लक्ष या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मध्यम मत्स्य जैविक प्रकल्पासाठी 27 लाभार्थी निवड करण्यात आली.

 

प्रत्येकी 25 लक्ष रुपये याप्रमाणे एकूण 6 कोटी 75 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनासाठी 22 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत प्रत्येकी 54 लक्ष या प्रमाणे एकूण 11 कोटी 88 लक्ष रुपयांचा लाभ दिला जातो. 10 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना उभारणे या योजनेसाठी 5 महिला लाभार्थींची निवड करण्यात आली. या योजनेत प्रती लाभार्थी 40 लक्ष या प्रमाणे एकूण 2 कोटींचा लाभ दिला जातो. 20 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना यासाठी 4 महिला लाभार्थी, प्रती लाभार्थी 80 लक्ष या प्रमाणे 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. तर दीड कोटी रुपयांच्या 50 टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना यासाठी एका महिला लाभार्थीची निवड करण्यात आली. 6 लाभार्थींना प्रत्येकी 25 लक्ष रुपयांच्या रेफ्रिजेरेटेड व्हेईकलचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत एकूण दीड कोटींच्या लाभाचे वाटप होणार आहे. इन्सुलेटेड व्हेईकल गटात 16 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे एकूण 3 कोटी 20 लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

 

याशिवाय 75 हजार रुपयांच्या मोटार सायकल वुईथ आईस बॉक्स गटासाठी 9 लाभार्थी, 3 लक्ष रुपयांच्या थ्री व्हीलर वुईथ आईस बॉक्स इन्क्लुडिंग ई-रिक्शा फॉर फिश वेंन्डीग या गटासाठी 7 लाभार्थींची निवड करण्यात आली. 20 लक्ष रुपयांच्या लाईव फिश वेन्डींग सेंटरसाठी 37 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या गटात प्रत्येकी 20 लक्ष या प्रमाणे 7 कोटी 40 लाख रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.

30 लक्ष रुपयांच्या मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 2 टन अ डे या गटासाठी 12 लाभार्थी, 1 कोटी रुपयांच्या मिडियम मिनी मिल्स ऑफ प्रोडक्शन कपॅसिटी ऑफ 8 टन अ डे या गटासाठी 1, प्रत्येकी 10 लक्ष रुपयांच्या कन्स्ट्रक्शन ऑफ फिश किओस्क इन्क्लुडिंग किओस्क ऑफ ॲक्वेरिअम, ओर्नामेंटल फिश या गटासाठी 9 महिला लाभार्थी आणि पारंपारीक मच्छिमारांसाठी खोल समुद्रातील मासेमारीसाठीच्या नौकांना सहाय्य या योजनेसाठी 18 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये प्रत्येकी 1 कोटी 20 लाख या प्रमाणे एकूण 21 कोटी 60 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. या योजनांसाठी राज्यभरातून एकूण तीन हजार अर्ज आले होते. यापैकी 234 लाभार्थ्यांची निवड आज लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आले

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला