चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी करताहेत आळंबी उत्पादन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी करताहेत आळंबी उत्पादन

आळंबी उत्पादन कोकणासाठी रोजगार निर्मितीचे साधन-विद्यार्थ्यांचा विश्वास

आबलोली (संदेश कदम) 

चिपळूण तालुक्यातील खरवते – दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय या महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून व्यावसायिक दृष्टिकोनातून आळंबी उत्पादन घेण्यात आले आहे.आळंबी उत्पादन कोकणासाठी रोजगार निर्मितीचे साधन ठरेल असा विश्वास या महाविद्यालयातील विद्यार्थांचा आहे.अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत हा प्रकल्प या विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आला आहे.कोकणामध्ये कृषि पुरक व्यवसायांची व्याप्ती वाढली पाहीजे. उद्योगशील तरुण वर्ग , महिला स्वयं सहाय्यता गट , बचत गट यांनी पुढाकार घेवुन कमी श्रम व खर्चामध्ये , उपलब्ध संसाधनांचा पुरेपुर वापर करुन हा व्यवसाय करत भरघोस उत्पादन घ्यावे या समुपदेशक उद्देश उराशी बाळगुन या विद्यार्थ्यांकडून आळंबीच्या विविध जातींचे महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावरील प्रयोग शाळेतून उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.25×15 आकाराच्या दोन बंदिस्त खोल्यांमधुन हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.यामध्ये सेंद्रिय व रासायनिक अश्या दोन्ही पद्धती वापरुन चार पद्धतीच्या आळंबीचे उत्पादन करत योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास कमीत कमी संसाधनां मध्ये हा प्रकल्प उत्तम रोजगाराचे साधन ठरेल हे सिद्ध केले आहे.या विद्यार्थ्यांकडून आळंबी च्या प्युरटेस फ्लोरिडा,ब्लु आॅईस्टर ,प्युरटेस साजर कॅजु व पिंक मशरूम्स आदी.जातीचे सुमारे 60 कीलो उत्पादन घेण्यात आले आहे. सध्य स्थिती मध्ये आळंबीचा बाजारभाव हा प्रती कीलो पाचशे रूपये असुन या विद्यार्थ्यांना या प्रकल्पामधुन प्रचंड नफा होताना दिसत आहे.तसेच चिपळूण परीसरातील हाॅटेल मध्ये या विद्यार्थ्यांकडून उत्पादित करण्यात आलेल्या आळंबीला मोठी मागणी आहे.या उत्पादनासाठी लागणारा प्रमुख घटक म्हणजे स्पाॅन या विद्यार्थ्यानी पुणे येथील कृषि महाविद्यालयामधुन मागवले असुन भविष्यामध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतूनच हे स्पाॅन कसे तयार होतील या साठी प्रयत्नशील आहेत. सदर विद्यार्थ्यांकडून उत्पादित झालेल्या आळंबी वर प्रक्रीया करत त्या पासुन बिस्किट, लोणचे,पावडर आदी. पदार्थ बनविण्यात आले असुन याची यशस्वी विक्री देखील करण्यात आली आहे. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी या प्रकल्पास भेट देवुन मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी प्रा. संग्राम ढेरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात