मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी सचिन घरत यांची सर्वानुमते निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मराठी एकीकरण समितीच्या कार्याध्यक्षपदी सचिन घरत यांची सर्वानुमते निवड

नवीमुंबई (मंगेश जाधव)

मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती आणि राज्यातील मराठी माणसाच्या आर्थिक-सामाजिक हक्कांसाठी गेल्या दहा वर्षांपासून रस्त्यावर उतरून ठामपणे संघर्ष करणाऱ्या मराठी एकीकरण समिती – महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी कार्यकारिणी सदस्य श्री. सचिन विनायक घरत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड आज दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत एकमताने करण्यात आली.

मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोवर्धन देशमुख यांच्या हस्ते श्री. सचिन घरत यांना नेमणूक पत्र देण्यात आले. यावेळी शाल, टोपी व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी सांगितले की, पूर्वीच्या कार्यध्यक्ष वर समितीविरोधात कृत्य प्रकरणी पद बरखास्त केल्यावर रिक्त असलेल्या पदावर मराठी माणसाच्या प्रश्नांवर तडजोड न करता, एकनिष्ठ, प्रामाणिक, संघटना शिस्त पाळून आक्रमक व संघटित लढा उभारण्यासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची आहे.

मराठी शाळांचे संरक्षण, मराठी भाषेचे प्रशासनातील व उद्योग क्षेत्रातील बळकटीकरण, स्थानिक रोजगारात मराठी युवकांना प्राधान्य, तसेच महाराष्ट्राच्या अर्थकारणात मराठी माणसाचा वाटा वाढविणे या मुद्द्यांवर श्री. सचिन घरत यांनी सातत्याने स्पष्ट व निर्भीड भूमिका घेतली आहे. ते गेल्या अनेक वर्षे संस्थेत कार्यरत असून अधिकृत कार्यकरिणी सदस्य आहे त्यांच्या या संघर्षशील भूमिकेमुळेच *कार्याध्यक्षपदाची* जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या प्रसंगी कार्यकारिणी मंडळ सचिव कृष्णा जाधव, खजिनदार प्रमोद पार्टे, सदस्य महेश पवार, सचिन कापडे, विजय मोरे यांच्यासह समितीचे राज्य प्रतिनिधी आनंदा पाटील, योगेश मोहन, अतुल पिंगळे, सागर पाटील,विक्रम डांगे, प्रसन्न जंगम, विठ्ठल नागणे, हितेश साळवी, सुरज चव्हाण, दीपेश नागलकर, सह अनेक शहर प्रतिनिधी किशोर शिंदे, केतन जाधव, ओमकार जाधव, उमेश राऊळ, प्रदीप पटणे, नाना खुणे, अजित महापदी, प्रवीण भोसले, शरद पंडित, नितेश सावर्डेककर, महेश घोगरे, अभिराज मोरे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन कार्याध्यक्ष म्हणून श्री. सचिन घरत यांनी सांगितले की, मराठी माणसाच्या प्रश्नांवर आता केवळ निवेदने नव्हे, तर निर्णायक आंदोलन उभारले जाईल. मराठी भाषा, शिक्षण, रोजगार आणि उद्योग क्षेत्रात मराठी माणसाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.

मराठी एकीकरण समितीच्या या नव्या संघटनात्मक बळकटीमुळे महाराष्ट्रभर मराठी अस्मिता आणि हक्कांच्या लढ्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला