गुहागर विधानसभा क्षेत्रातील गावांचा विकास हाच मनसेनेचा ध्यास..! – गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोद गांधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर विधानसभा क्षेत्रातील गावांचा विकास हाच मनसेनेचा ध्यास..! – गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोद गांधी

(गावं,वाडी व तेथील समाजातील विकासाच्या समस्या, प्रश्न जाणून घ्यावेत, या उद्देशाने आरती संग्रहाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न..!)

आबलोली (संदेश कदम)

गुहागर विधानसभा क्षेत्रातील गावांचा विकास हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्यास आहे,

गावं,वाडी व तेथील समाजातील विकासाच्या समस्या, प्रश्न जाणून घ्यावेत, या उद्देशाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरती संग्रहाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत असे मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी सांगितले.

त्यांनी पुढे सांगितले की,विकास म्हटला की, पाणी, रस्ते, वीज हे मुख्य घटक समोर येतात. गाव-वाडी वस्तीवर हेच प्रश्न प्राधान्याने पुढे येतात. गुहागर तालुक्याचा सर्वांगीण विकास पाहिला तर या पलिकडे फारशी प्रगती झालेली नाही. मतदारांच्या माध्यमातून निवडून गेलेला लोकप्रतिनिधी पुन्हा पाच वर्षे गाव, वाड्यांपर्यंत येत नाहीत. ज्या गावातून चांगले मतदान होत नाही त्या भागाकडे लोकप्रतिनिधी अजिबात फिरकत नाहीत. तेथील नागरिक, कार्यकर्ते यांना जुळवून न घेता तेथील समस्या, प्रश्नांकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. प्रसंगी एकप्रकारचा अप्रत्यक्ष राग व्यक्त करताना ते दिसतात. त्यांना मुख्य राजकीय प्रवाहात आणले जात नाहीतच शिवाय त्यांचा केवळ राजकीय वापर निवडणुकांपुरता केला जातो, ही सत्यस्थिती आहे. त्यामुळे आज गावांच्या विकासावर मोठा परिणाम झालेला असल्याने येथील तरुणांमध्ये लोकप्रतिनिधीं विरुध्दची एकप्रकारची चीड निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.गुहागर तालुक्याचा अभ्यास केला तर आजही ग्रामीण भागातील रस्ते सुव्यवस्थित नाहीत. केले तरी ते दोन-तीन वर्षातच पावसाने वाहून जातात. खड्डे पडतात. अशावेळी वारंवार त्या रस्त्यावर खर्च टाकून शासनाच्या निधीचे नुकसान केले जाते. शासकीय पाणी योजनांची अवस्था त्याहूनही बिकट आहे. कित्येक गावांमधील स्वतंत्र वाड्यांच्या जलजीवनसारख्या मोठ्या महत्वाकांक्षी पाणी योजना रखडल्या आहेत. काही ठिकाणी निकृष्ट कामे झालेली आहेत. गाव-वाड्यांवर गंजलेले वीज खांब वा जीर्ण झालेल्या वीजवाहिन्या असो असे वीजेबाबतचे असंख्य प्रश्न धूळखात आहेत. कित्येक दुर्गम गावांमध्ये सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र असूनसुध्दा तेथील आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. सर्वसामान्यांना खाजगी महागडे उपचार परवडत नाहीत. अंजनवेलच्या रत्नागिरी गॅस प्रकल्प क्षेत्रातील निरामय सारखे रुग्णालय आज कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात मोठे, सुसज्ज रुग्णालयच नाहीत.बेरोजगाराची समस्या ही गुहागर तालुक्याच्या पाचविलाच पूजलेली आहे. तालुक्यात कोणताही उद्योग नाही. रत्नागिरी गॅस प्रकल्प आहे तोही डबघाईला आला असून अनेक स्थानिक तरुणांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे भयानक वास्तव आहे. तालुक्याला विशाल समुद्रकिनारा, चांगला निसर्ग लाभूनही पर्यटनाच्या दृष्टीने येते कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले येथील उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. हॉटेल, लॉज, घरगुती खाणावळी असे लहान-मोठे व्यवसाय चालविताना स्थानिकांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. हेदवी, वेळणेश्वर या तीर्थस्थळ व पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्तेच व्यवस्थित नाहीत. पुरातन मंदिरे, गड-किल्ले दुर्लक्षित आहेत. गुहागर-विजापूरसारखा राष्ट्रीय महामार्ग होऊनही या रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेले दुर्लक्ष शोभनीय नाही. त्यामुळे येथील सत्यस्थिती तरुणांना, नागरिकांना निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने आम्हीं आरतीसंग्रहाच्या माध्यमातून गावागावात घराघरात पोहोचलो आहे.गुहागर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची ही झालेली दुर्दशा कुणालाही पटणार नाही. यासाठी आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन सामाजिक भावनेने व निःस्वार्थीपणे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शासकीय निधी व्यतिरिक्त आपल्या गाव, वाडीच्या विकासासाठी, मुलभूत प्रश्नांसाठी आमच्याकडून सामाजिक भावनेने मदत करणे हे आमचे कर्तव्य समजतो. यासाठी तुमची साथ व सहकार्य आम्हाला हवे आहे. समाजसेवेची आवड व बांधिलकी जोपसणाऱ्या गाव-वाडीतील तरुणांनी यासाठी एकत्र यावे व आम्हाला संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी मो. न. ९०९०४८८४८८ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]