राज्य मंत्री मंडळा ची कॅबिनेट बैठक पार….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेच्या १.६० कोटी लाभार्थी, ४७८७००००००० रुपयांचे वाटप, कॅबिनेट बैठकीत १५ मोठे निर्णय.

मुम्बई : महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना ४ हजार ७८७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कॅबिनेट मंत्री प्रत्यक्ष उपस्थित होते. तर ब्राँकायटिसची लागण झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन हजेरी लावली होती.

State Cabinet Meeting Decisions : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना ४ हजार ७८७ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतील संक्षिप्त निर्णय
(सार्वजनिक बांधकाम)
पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार.

(पशुसंवर्धन विभाग)
अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार.

अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार.

: (जलसंपदा विभाग)

राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच शंभर टक्के भरली

(महिला व बालकल्याण)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप
(मदत व पुनर्वसन)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत.
शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे

(कृषी विभाग)
राज्यात १२१ टक्के पेरण्य

(विधी व न्याय विभाग)
काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय
पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय
हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा

: (जलसंपदा विभाग)
धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार

:पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार

(कामगार विभाग)
औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]