बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना संधी…..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर! यश दयालसह ‘या’ खेळाडूंना संधी.….

IND vs BAN Test Series : बीसीसीआयने फक्त पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs BAN Team India squad announced for 1st test match against Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी १६ सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाच्या मधल्या फळीत सर्फराझ खानचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालचा प्रथमच कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहली, केएल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतही कसोटी संघात पुनरागमन करणार आहेत.  त्याचबरोबर आकाश दीप, सर्फराझ, ध्रुव जुरेल कायम ठेवले आहे. यावेळी ही  श्रेयस अय्यरला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळालेली नाही. दुलीप ट्रॉफीमध्येही त्याला विशेष काही करता आले नाही. याशिवाय श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याची कामगिरी  फारशी समाधान कारक नव्हती.

 

 

 

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]