कुडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. सुरेंद्र रहाटे यांची बिनविरोध निवड.!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्री. सुरेंद्र रहाटे, , तंटामुक्ती समिती अध्यक्ष, कुडली

कुडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी श्री. सुरेंद्र रहाटे यांची बिनविरोध निवड.
आबलोली (संदेश कदम)………
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कुडली या ग्रामपंचायतीची ग्रामसभा माजी सरपंच श्री.शरद पावरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली.या सभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती समीती गठीत करण्याचा विषय ग्रामसेवक श्री.हरिष कुळये यांनी सभागृहा समोर मांडला यावेळी श्री.मनोहर निमकर यांनी कुडली ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समीती अध्यक्षपदी श्री. सुरेंद्र शांताराम रहाटे यांची बिनविरोध निवड करण्यात यावी अशी सूचना मांडली या सुचनेला श्री. अनिल जाधव यांनी अनुमोदन दिले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि श्री.सुरेंद्र शांताराम रहाटे यांची सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. श्री.सुरेंद्र शांताराम रहाटे यांनी यापूर्वी कुडली ग्रामपंचायत सदस्य असतानाहि उल्लेखनीय कामगिरी केली आहे.तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा कुडली नं. १ या शाळेच्या व्यवस्थापन कमीटी अध्यक्ष म्हणून हि ते उत्तम काम करीत आहेत.श्री. सुरेंद्र शांताराम रहाटे यांना सामाजिक कार्याची आवड असून ते दुस-याच्या सुख – दु:खात , अडीअडचणीत धाऊन जातात अशी त्यांची ख्याती आहे गावातील सर्व समाजाला सोबत घेऊन गावातील एकोपा – बंधूंभाव अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट मत श्री. सुरेंद्र शांताराम रहाटे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी ग्रामसभेचे अध्यक्ष माजी सरपंच श्री.शरद पावरी, ग्रामसेवक श्री. हरिष कुळये, सरपंच श्री. नितीन गावणंग, उपसरपंच श्री. संतोष पावरी यांचेसह उपस्थित सर्वांनीच नवनिर्वाचित तंटामुक्ती समीती अध्यक्ष श्री. सुरेंद्र शांताराम रहाटे यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]