मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, सरकारने केले पुन्हा नवीन बदल….. तरच मिळणार ४५०० रू

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, सरकारने केले पुन्हा नवीन बदल….. तरच मिळणार ४५०० रू…..

मुंबई:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण(mazi ladki bahin yojana )योजनेसाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण असं असलं तरी सरकारने आता नुकताच एक नवा जीआर आणला आहे. ज्यामुळे ऑफलाइन अर्ज भरणाऱ्या महिलांनी जीआरमधील एक गोष्ट पाळली नाही तर त्यांना 4500 हजार रुपये मिळणार नाहीत.

ज्या महिला माझी लाडकी बहीण योजनेत सप्टेंबर महिन्यासाठी पात्र ठरतील त्यांच्या खात्यात थेट 4500 रुपये जमा होणार आहेत. मात्र, ऑफलाइन अर्ज भरताना महिलांना एक गोष्ट ही कटाक्षाने पाळावी लागणार आहे. ती म्हणजे महिलांना त्यांचा अर्ज हा फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच जमा करायचा आहे. ऑफलाइन अर्ज हा आता इतर कुठेही भरता येणार नाही.

नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

मात्र आता यापैकी केवळ अंगणवाडी सेविकांनाच अर्ज स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेचा नवा शासन निर्णय (GR)जसाच्या

महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक- मबावि – २०२४/प्र.क्र. ९६/का-२

संदर्भ :- महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.मबावि – २०२४/प्र.क्र.९६/का-२, दि.२८.०६.२०२४, दि.०३.०७.२०२४, दि.१२.०७.२०२४, दि.२५.०७.२०२४ व दि.०२.०९.२०२४

प्रस्तावना :- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

शासन निर्णय दि.०२.०९.२०२४ अन्वये “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत यापूर्वी ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता, सदर योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, २०२४ मध्ये या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास संदर्भाधीन दि. ०२.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दि.१२.०७.२०२४ व दि.२५.०७.२०२४ अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका / अंगणवाडी सेविका, “समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager), आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या ११ प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते.

आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिंना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. सबब, या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात येत आहे.

???????? https://ratnagirivartahar.in/archives/1317

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें