स्वामी संस्था कॅन्सरग्रस्तांसोबत साजरी करणार दिवाळी

स्वामी संस्था कॅन्सरग्रस्तांसोबत साजरी करणार दिवाळी….

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी संस्थेतर्फे शनिवार, २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. शिरोडकर हॉल, ग्लोबल हॉस्पिटलसमोर, डॉ. बोर्जेस मार्ग, परळ, मुंबई-१२ येथे कर्करोग रुग्णांसोबत दिवाळी साजरी करणार आहे.

 

यानिमित्ताने कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी ज्येष्ठ नागरिकांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच त्यांना दिवाळीचा फराळ, बेडशीट, चटई, माऊलीसाठी नवीन साडी, दादासाठी शर्ट पँट-पीस, उटणे, साबण, तेल, पावडर आदी वस्तू देण्यात येणार आहेत.

 

परगावात कॅन्सर उपचारासाठी येणाऱ्या कॅन्सर रुग्णांना उपचारातून थोडा दिलासा मिळावा आणि त्यांना दिवाळी साजरी करता यावी, यासाठी स्वामी संस्थेचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. स्वामी संस्थेतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते व देणगीदार उपस्थित राहणार आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें