आबलोली वरची पागडेवाडी येथील श्रीमती.सावित्री नारायण पागडे यांचे दु:खद निधन..

आबलोली वरची पागडेवाडी येथील श्रीमती.सावित्री नारायण पागडे यांचे दु:खद निधन..!

आबलोली (संदेश कदम)….
गुहागर तालुक्यातील आबलोली वरची पागडेवाडी येथील महिला मंडळाच्या जेष्ठ सभासद आणि मार्गदर्शक सामाजिक, धार्मिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तसेच दुस-याच्या मदतीला धावून जाणा-या आणि परोपकारी व रोखठोक स्वभावाच्या तसेच कष्टमय जिवन जगणा-या आबलोली वरची पागडेवाडी येथील श्रीमती. सावित्री नारायण पागडे उर्फ पंडी आई यांचे वृध्दपकाळाने वयाच्या ९४ व्या वर्षी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रहात्या घरी सकाळी ८:३० वाजता दु:खद निधन झाले.त्यांचे सातवे विधी व कार्यविधी रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ त्यांच्या रहात्या घरी आयोजित करण्यात आले आहे. कै. श्रीमती.सावित्री नारायण पागडे उर्फ पंडी आई यांना मुळ बाळ नव्हते परंतू पती निधनानंतर त्यांचा पुतणे सुर्यकांत बाळू पागडे आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेतील महसूल विभागातील कर्मचारी विलास बाळू पागडे तसेच कै. चंद्रकांत पागडे यांनी आपली चुलती पंडी आई हिचा स्वत:च्या आई प्रमाणे संभाळ केला त्यामुळे पंडी आईनेहि पुतण्यांनाही पोटच्या मुलाप्रमाणे आईची माया देऊन सांभाळ केला. कै. श्रीमती. सावित्री नारायण पागडे उर्फ पंडी आई यांच्या अंत्ययात्रेसाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसह आबलोली पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें